![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majhi Tujhi Reshimgath : आजोबांमुळे परी घर सोडणार? नेहा-यशचा संसार सुरू होण्याआधीच मोडणार?
Majhi Tujhi Reshimgath : Majhi Tujhi Reshimgath : यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे. पण परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आजोबांपासून लपवून ठेवण्यात आले आहे. परीलादेखील हे समजते. त्यामुळे जग्गू आजोबांना त्रास नको व्हायला यासाठी परी घर सोडण्याचा निर्णय घेते.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात परी बॅग घेऊन नेहाचे घर सोडताना दिसणार आहे. यश-नेहा परीला शोधू शकतील का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. यश आणि नेहाने प्रेमाची कबुली दिली असल्याने मालिकेत सध्या यश आणि नेहाचा लव्ह ट्रॅक सुरू आहे.
View this post on Instagram
नेहा परीला सुखरुप घरी आणेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत रंगणार होळी विशेष भाग
The Kashmir Files : 'भोपाळी म्हणजे समलैंगिक', विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य; दिग्विजय सिंह म्हणाले, 'संगतीचा परिणाम...'
RRR Box Office Collection Day 1: जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू; पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)