Ganesh Utsav 2025 : पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
Ganesh Utsav 2025 : पर्यावरण पूरक मूर्तीच्या निर्मितीच्या विरोधात काहीशी भूमिका मूर्तीकारांनी आणि गणेश मंडळांनी घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे यापुढे पीओपी मूर्तींच्या संदर्भात राज्य सरकारची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल.

मुंबई : माघी गणपती उत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या पीओपी गणेश मूर्तीना तलावांमध्ये विसर्जित करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता आगामी काळात येणाऱ्या गणेश उत्सवासाठी देखील मुंबई महानगरपालिकेने पीओपी मूर्तीना पूर्णपणे बंदी असल्याचे म्हटले आहे.
या निर्णयावर आता राजकारण्यांकडून संमिश्र अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबाबत म्हटले आहे की मूर्तिकरांनी याबाबत विचार करायला हवा. तर माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांनी मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी राज ठाकरेंवर निशाना साधतं म्हटलं आहे की त्यांनी काय बोलाव हे मला माहित नाही. पण सरकारने मधला मार्ग काढावा असे ही त्यांनी सूचवलं आहे.
संवादाने मधला मार्ग साधावा
मुंबईतील मूर्तिकरांनी सरकारला मधला मार्ग काढायची विनंती केली आहे. आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करु असेही म्हटले आहे. मुंबईचा राजा गणेश गल्ली गणेशमूर्ती बनविणारे सतीश वाळीवडेकर यांनी म्हटलं आहे की, या सणावर अनेक जणांचं अर्थचक्र अवलंबून आहे. मोठ्या मूर्ती घडवताना अनेक छोट्याछोट्या गोष्टी लागतात. तर गणेशोत्सवात उंच मूर्तींच्या हार फुलांवर तसेच गणेश मूर्ती पाहायला येणाऱ्या भाविकांवर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने यावर बंदी आणू नये तर मधला मार्ग संवाद करून काढावा.
पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील मूर्तिकरांनी मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेनमध्ये मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक घेतली. न्यायालयाच्या निर्णया विरोधात लढा देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आल्याचा बोलले जात आहे. तसेच इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तिकारांनी उपस्थित केला.
मूर्तीकारांच्या भूमिकेला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
मूर्तिकारांच्या या भूमिकेला लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर सुपारी ठेवून पूजा करण्याची वेळ येईल, असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितलं आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की पीओपी बाबत सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. ते योग्य निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितलं.
गणेश मंडळांची रोखठोक भूमिका
या सगळ्या मुद्द्यावर गणेश मंडळांनी ही रोखठोक भूमिका घेतलेली आहे. पीओपीच्या मूर्तीने पर्यावरणाची हानी होत असेल तर पुण्यातील मुळा-मुठा नदीची हानी का झाली असा सवाल उपस्थित केला आहे. तर शासनाने न्यायालयाच्या इतर निर्णयांकडे सुधा लक्ष द्यायला हवे. तसेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ हे समुद्र किनारी अवशेष उचलण्यासाठी पोहचतात ही बाब निर्देशनास आणण्याच प्रयत्न केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा फक्त पीओपी ने होतो हे आम्हाला खटकत आहे असे उघड मत आता मंडळांनी मांडलं आहे.
राज्य सरकार काय भूमिका घेणार?
मुंबई महानगरात गणेशोत्सवादरम्यान मोठी लगबग पाहायला मिळते. यंदा आगामी गणेशोत्सवावर कोर्टाच्या आधीन महानगरपालिकने दिलेल्या नोटिसेच सावट आहे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे पर्यावरणपूरक असावे असे म्हटलं आहे. या निर्णयाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय मूर्तिकार आणि मंडळांनी घेतला आहे. शाडू मातीच्या मूर्ती या महाग आणि वजनदार असतात असेही त्यांचे म्हणणे आहे. तर राजकीय नेत्यांची ही एंट्री बाप्पाच्या आगमनात आहे. या सर्वांवर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे विशेष लक्ष
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
