Nashik News : नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत
Nashik News : काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साधू महंतांची धरपकड केली आहे.

Nashik News : पुणे रोडवरील काठे गल्ली (Kate Galli) परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका (Nashik NMC) हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आज शनिवारी (दि. 22) आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळपासून महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे. तर जोपर्यंत अनधिकृत बांधकाम हटविले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी साधू महंतांची धरपकड सुरू केली आहे. महंत सुधीरदास पुजारी (Sudhirdas Pujari) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. या धार्मिक स्थळावर कारवाई सुरु असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली आहे. मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत. द्वारका ते काठे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे.
महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात
या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना या भागात महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड सुरू आहे. महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अनिकेत शास्त्री यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना घराबाहेर पडण्याची मनाई पोलिसांनी केली आहे. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे काठे गल्ली चौकात दाखल झाल्या आहेत.
वाहतुकीसाठी प्रवेश बंद
राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्सकडे जाणारा- येणारा रस्ता
नागजी चौक ते काठे गल्ली सिग्नल ते नागजी जाणारा-येणारा मार्ग
उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा जाणारा-येणारा मार्ग
हे मार्ग बंद
पुणे हायवेने नाशिक रोडकडून द्वारकाकडे येणारा- जाणारा मार्ग
पंचवटीकडील महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारकाकडे येणारी वाहने
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सव्र्व्हिस रोडने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने
सारडा सर्कलकडून द्वारका सर्कलकडे येणारी सर्व वाहने
मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
बिटको पॉइंट, नांदूर नाका, फेम सिग्नल, जनार्दन स्वामी मठ, संभाजीनगर रोड, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे सिटी सेंटर मॉल, गडकरी चौक.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
