Air India : एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खूर्ची मिळाली, शिवराज सिंह भडकले, टाटांचा उल्लेख करत सगळंच काढलं
Shivraj Singh Chauhan: शिवराज सिंह चौहान यांना भोपाळहून दिल्लीला विमानातून जाताना तुटलेली खूर्ची मिळाली. त्यांनी संपूर्ण प्रवास त्याच सीटवरुन प्रवास केला.

Shivraj Singh Chauhan नवी दिल्ली: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी भोपाळहून दिल्ली जाताना जो प्रकार घडला तो सांगितला आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना आलेला वाईट अनुभव त्यांनी शेअर केला.
शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करुन म्हटलं की," मला भोपाळहून दिल्लीला यायचं होतं, पुसामध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं उद्घाटन आणि कुरुक्षेत्रमध्ये प्राकृतिक शेती मिशनच्या बैठकीला चंदीगडला शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करायची होती. मी एअर इंडियाच्या फ्लाईट एआय 436 चं तिकीट काढलं होतं, तिथं मला सीट क्रमांक 8 सी मिळाली होती.
शिवराज सिंह चौहान म्हणाले," मी जाऊन सीटवर बसलो तेव्हा ती तूटलेली होती, आतील बाजूला खचलेली होती. त्यावर बसणं त्रासदायक होतं. जेव्हा मी विमानातील कर्मचाऱ्यांना विचारलं की खराब सीट होती तर का दिली? त्यावर त्यांनी म्हटलं की व्यवस्थापनाला पहिल्यांदा सांगितलं होतं की ती सीट चांगली नाही, या सीटच्या तिकिटाची विक्री करुन नका, अशी एकच सीट नाही अनेक सीट आहेत."
टाटांच्या व्यवस्थापनाकडून खेद व्यक्त
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची अडचण होत असल्याचं पाहताच इतर प्रवाशांनी त्यांना त्यांच्या सीटवर बसण्याची विनंती केली. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: साठी दुसऱ्याला त्रास का द्यायचा असा विचार केला आणि तुटलेल्या सीटवरुन प्रवास केला, असं म्हटलं. शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं टाटांच्या हातात एअर इंडियाचं व्यवस्थापन गेल्यानंतर तरी एअर इंडियाी सेवा चांगली असेल. मात्र हा माझा भ्रम होता, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत नागरी उड्डाण मंत्रालय आणि हवाई वाहतूक नियंत्रण डीजीसीएनं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एअर इंडियाच्या हँडलवरुन शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महोदय, आम्ही तुम्हाला सहन कराव्या लागलेल्या असुविधेबद्दल खेद आहे. तुम्ही निश्चिंत राहावं, आम्ही या प्रकरणावर लक्ष्य ठेवून आहोत कारण भविष्यात अशा घटना होऊ नयेत. आम्हाला तुमच्याशी बातचीत करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. कृपया आम्हाला संपर्क करण्यासाठी डीएम करा, असं एक्सवर पोस्ट करण्यात आलं आहे.
आज मुझे भोपाल से दिल्ली आना था, पूसा में किसान मेले का उद्घाटन, कुरुक्षेत्र में प्राकृतिक खेती मिशन की बैठक और चंडीगढ़ में किसान संगठन के माननीय प्रतिनिधियों से चर्चा करनी है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 22, 2025
मैंने एयर इंडिया की फ्लाइट क्रमांक AI436 में टिकिट करवाया था, मुझे सीट क्रमांक 8C आवंटित हुई। मैं जाकर…
इतर बातम्या :
























