Throwback Photo : फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? सध्या मालिका विश्वावर करतेय राज्य!
Throwback Photo : टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Throwback Photo : आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना असते. सेलिब्रेट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जे काही शेअर करतात, ते लगेच व्हायरल होते. यातही जर त्यांचा एखादा जुना फोटो असले, तर चाहते तो नक्कीच व्हायरल करतात. या फोटोंशी जोडल्या गेलेल्या आठवणी देखील कलाकार शेअर करतात. टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील (Aai Kuthe Kay Karte) एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
टीव्ही-मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) अर्थात सगळ्यांची लाडकी ‘आई’. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. या भूमिकेतून मधुराणी घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा हटके विषय आणि त्यांची संकल्पना प्रेक्षकांना खूप भावली आहे. नुकताच मधुराणीने तिचा एका जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो तिच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटमधला आहे. यासोबतच्या आठवणी देखील तिने शेअर केल्या आहेत.
या फोटोशूटवर मी पुढे खूप काम केलं...
‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेला हा फोटो तिच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटमधील आहे. या फोटोच्या आठवणी सांगताना मधुराणी एक पोस्ट लिहिली आहे. ‘मुंबईत आल्यानंतरचं माझं पहिलं वहिलं फोटो शूट... सुकन्या कुलकर्णी मोने ह्या माझ्या ज्येष्ठ सखीने मला ह्या अमेझिंग फोटोग्राफरचं नाव सुचवलं... आशीष सोमपुरा...! त्यावेळी त्याच्या फी खूप वाटल्या होत्या... ते पैसे कसेंबसेच जमवले होते ह्यावेळी... पण त्याची माझी पहिल्या भेटीतच मैत्री झाली... मी नवीन होते तरी मला त्यानी कम्फर्टेबल केलं.. मुख्य म्हणजे तो त्याच्या मॉडेल्सला अतिशय आदराने वागवतो... ही त्याची मोठी क्वॉलिटी...ह्या फोटोशूट वर मी पुढे खूप काम केलं... खूप जाहिराती केल्या.... हे शूट खूप खास आहे माझ्यासाठी....चल आशिष, परत करूया असं एक मस्त फोटोशूट’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
पाहा पोस्ट :
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
- Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
