
Entertainment News Live Updates 21 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व होणार सुरू
ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत.
कान्स चित्रपट महोत्सवाला अमृता फडणवीस यांची हजेरी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्या आता 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला पोहोचल्या आहेत.
पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा आहे. महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमाचाच बोलबाला आहे. पहिल्या आठवड्यात 'धर्मवीर' सिनेमाने 13.87 कोटींची कमाई केली आहे. तर आता दुसऱ्या आठवड्यातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीदेखील अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.
मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ, कान्स चित्रपट महोत्सवात अमित देशमुख यांचा विश्वास
मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.
सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं 'Jeena Zaroori Hai' रिलीज
छोटा पडदा गाजवलेला आणि बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'जिना जरुरी हैं' ( Jeena Zaroori Hai) असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं ऐकून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
