Entertainment News Live Updates 11 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Aai Kuthe Kay Karte: अनिषसाठी घेतलेली साखरपुड्याची अंगठी हरवली; 'आई कुठे काय करते!' मालिकेचा प्रोमो व्हायरल
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये ईशा आणि देशमुख कुटुंब हे शॉपिंग करताना दिसले. आता आई कुठे काय करते या मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की अनिषसाठी घेतलेली अंगठी ही हरवली आहे.
View this post on Instagram
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराने सगळ्यांना सांगितलं सत्य; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत स्वरा ऊर्फ स्वराजला गेल्या कित्येक दिवसांपासून बोलता येत नाहीये. पण सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज म्हणजे स्वराला आता बोलता येत आहे. हे पाहुन मल्हारला आनंद झाला आहे.
View this post on Instagram
The Elephant Whisperers : 'ग्रेट-भेट!' धोनीनं घेतली ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमची भेट; गिफ्ट म्हणून दिली CSK ची जर्सी
Dhoni Met The Elephant Whisperers Team: क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) च्या टीमची भेट घेतली आहे. 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली. महेंद्र सिंह धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
