Entertainment News Live Updates 9 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Tunisha Sharma Case : शिझानच्या जामीन अर्जावर आता तारीख पे तारीख
Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी आता शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीन अर्जावर 11 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे.
Chitra Wagh On Urfi Javed : मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू; उर्फी जावेदच्या नव्या ट्वीटने चित्रा वाघ पुन्हा संतापल्या
Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत 'अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू" असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. "मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू", असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवर आक्षेप घेत आहेत. आता मुंबई पोलीस उर्फीवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन 'बिग बॉस' बघायचा अक्षय केळकर
Anuj Thakare On Bigg Boss Marathi Seoson 4 Winner Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay kelkar) खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्याची धमक अक्षयमध्ये आहे. एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत अक्षयचा खास मित्र अनुज ठाकरे (Anuj Thakare) म्हणाला,"अक्षय माझ्यासाठी दागिना आहे".
Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन 'बिग बॉस' बघायचा अक्षय केळकर; खास मित्र म्हणतोय...
Akshay Kelkar : रिक्षा चालकाचा मुलगा ते 'Bigg Boss Marathi 4'चा विजेता
Akshay Kelkar Bigg Boss Marathi Season 4 Winner : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व नुकतच संपलं असून अक्षय केळकर (Akshay Kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या अक्षयचे पाय आजही जमिनीवरच आहेत.
View this post on Instagram
Shilpa Shetty : रिचर्ड गिअरसोबतच्या 'त्या' चुंबनाचं प्रकरण, खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका
Shilpa Shetty : तब्बल 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड सूपरस्टार रिचर्ड गिअरसोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या 'किस'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली. साल 2007 च्या घटनेचा तो व्हिडिओ पाहिल्यास शिल्पाचा कोणतंही अश्लिल कृत्य करण्याचा हेतू नव्हता. आयोजित कार्यक्रमाचा उद्देश धर्मादाय आणि एड्सची जनजागृती करण्याचा होता. याच हेतूने रिचर्ड गिअरही तेथे उपस्थित होते. मात्र, नामांकित व्यक्तींचा सहभाग असल्यानं अवास्तव प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही समाजकंटकांनी या घटनेचा चुकीचा अर्थ काढून अश्लिलता आणि असभ्यता पसरविल्याचा आरोप आपल्यावर केल्याचा युक्तिवाद शिल्पाच्यावतीनं अँड. मधुकर दळवी यांनी हायकोर्टात केला. त्याची दखल घेत हायकोर्टानं सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

