Bigg Boss Marathi 4: रिक्षा चालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; Akshay Kelkar वडिलांच्या रिक्षातूनच पोहचला होता सेटवर
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर याचे वडील रिक्षा चालक आहेत.
Akshay Kelkar Bigg Boss Marathi Season 4 Winner : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व नुकतच संपलं असून अक्षय केळकर (Akshay Kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या अक्षयचे पाय आजही जमिनीवरच आहेत.
अक्षयचे वडील जयेंद्र केळकर हे एक रिक्षा चालक आहेत. ते आजही रिक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. वडिलांच्या रिक्षातूनच अक्षय 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचला होता. अक्षयच्या आई-वडिलांनी त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. पण त्याने कधीही त्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला नाही.
अक्षय खूप कमी वयात खूप मोठा पल्ला गाठू शकला आहे. अक्षयच्या यशात त्याच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर अक्षयला 15 लाख 55 हजारांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली. तसेच तो या पर्वाचा कॅप्टन ऑफ द सीझनदेखील ठरला. याबद्दल त्याला 5 लाखाचा चेक मिळाला आहे. तसेच पीएनजी ज्वेलर्सतर्फे अक्षयला 10 लाखांचं ब्रेसलेट बक्षीस म्हणून मिळालं आहे.
View this post on Instagram
अक्षय केळकर 'या' कारणाने ठरला 'Bigg Boss Marathi 4'चा विजेता
अक्षयने बिग बॉस मराठीचं चौथं पर्व जिंकण्याचं ध्येय घेऊन बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. महाविजेता होण्यासाठी तो प्रयत्नदेखील करत होता. खेळाडूवृत्ती, टास्कमधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे अक्षय चर्चेत राहिला. अक्षयला या पर्वात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यात अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले आहे. जिंकल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या