(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : आमिर खान साऊथ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत ते हिट अँड रन प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता अटकेत; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
हिट अँड रन प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता अटकेत; नंतर जामीन मंजूर, ड्रग्स पार्टीशीही संबंध
Supertstar Arrested in Hit And Run Case : मल्याळम चित्रपटससृष्टीतील (Malayalam Film Industry) प्रसिद्ध अभिनेता श्रीनाथ भासी (Sreenath Bhasi) याला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Case) अटक केली होती. मात्र, मंगळवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. हे प्रकरण ड्रग पार्टीशी संबंधित आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Aamir khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट साऊथ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत, सुपरस्टार रजनीकांतसमोर आमिर खान 'सूपर विलन'
Aamir khan Villain in LCU : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज झाला आहे. पण, यावेळी आमिर खान हिरोच्या नाहीतर विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान LCU युनिव्हर्समध्ये सूपर विलन बनणार आहे. LCU युनिव्हर्स म्हणजेच लोकेश कनकराज यांच्या आगामी चित्रपटात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान सूपर विलन बनून सर्वात मोठ्या ॲक्शन थ्रिलर युनिव्हर्सचा भाग होण्यास सज्ज झाला आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यात शिरलं पाणी, चैन्नईमधील मुसळधार पावसाचा फटका
Rain Update : चेन्नईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान सुपरस्टापर रजनीकांत यांच्या आलिशान घरामध्येही पाणी शिरलं आहे. रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील बंगल्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. या परिसरात इतरही सेलिब्रिटी आणि दिग्गज नेत्यांची घरं असून त्यांच्या घरातही पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय सुरु आहेत.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Nikki Tamboli : प्यार हैं तो हैं... निक्कीने दिली प्रेमाची कबुली; म्हणाली, "अरबाजने माझ्या आईवडिलांसोबतही..."
Nikki Tamboli in Love With Arbaaz Patel : बिग बॉस मराठी सीझन 5 संपला असला तरी, त्यातील सदस्यांची चर्चा मात्र कायम आहे. यंदाच्या सीझनमधील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना निक्की आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा होती. तसेच, अरबाजची गर्लफ्रेंड असल्याच्या आणि त्याचं लग्न झालेलं असल्याच्या अफवाही जोरदार व्हायरल झाल्या होत्या. असं असताना आता निक्कीने अरबाजसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Bigg Boss 18 : चुम दरांगने शिवी दिल्यावर अविनाश मिश्राची सटकली, रागाच्या भरात... ; अखेर घरातील सदस्यांनी मिळून केलं बेघर
Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. यंदाचा सीझन काहीसा वेगळा आहे. यावेळी आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. पहिल्या आठवड्यातील जेलच्या ट्वीस्टवरुन प्रेक्षकांना याचा काहीसा अंदाज आला असेल. पण, तुम्ही विचार करत आहात, बिग बॉस त्याच्याही दोन पाऊलं पुढे आहेत. या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी 10 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यानंतर आता राशन मिळवण्यासाठी दोन सदस्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे किंवा एका सदस्याला एलिमिनेट करावं लागणार आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Bhool Bhulaiyya 3 : कार्तिक आर्यनने चुकून सांगितला 'भूल भुलैया 3' च्या क्लायमॅक्सचा ट्विस्ट, चित्रपटासाठी घेतोय एवढी रक्कम
Bhool Bhulaiyya 3 : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भुल भुलैया 3 चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीचा आगामी भुल भुलैया 3 चित्रपट दिवाळीमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाह मिळताना दिसत आहे. चित्रपटातील गाणंही लवकरच रिलीज होणार असून त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच कार्तिक आर्यनने मोठा ट्वीस्ट उघड केला आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
OTT release: श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’, OTT वर या आठवड्यात काय पहाल? संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
OTT release: ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची चांगलीच चंगळ सुरु असल्याचे पहायला मिळते. सणावारांचा महिना आता सुरु झाला आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मोकळ्या वेळेत सिनेमा, वेब सिरिज पाहण्यातली मौजच वेगळी आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक वेबसिरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता श्रद्धा कपूरच्या स्त्री २ सह अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणार आहे. कोणते सिनेमे आणि वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार? पाहूया...
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Rakul Preet Singh Injured : रकुल प्रीत सिंहसोबत जिममध्ये मोठा अपघात, डेडलिफ्ट करताना पाठीला गंभीर दुखापत
Rakul Preet Singh Injury Update : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसोबत जीममध्ये वर्कआऊट करताना मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिममध्ये व्यायाम करताना रकुल प्रीतच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. वर्कआऊट सेशनमध्ये रकुल 80 किलोचा डेडलिफ्ट करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिच्या पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. रकुलची दुखापत एवढी गंभीर आहे की, गेल्या काही दिवसांपासून ती बेड रेस्टवर आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...