Bigg Boss 18 : चुम दरांगने शिवी दिल्यावर अविनाश मिश्राची सटकली, रागाच्या भरात... ; अखेर घरातील सदस्यांनी मिळून केलं बेघर
Avinash Mishra Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात आज पहिलं एविक्शन होण्याची शक्यता आहे, पण हे एविक्शन थोड्या वेगळ्या पद्धतीने होईल.
Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. यंदाचा सीझन काहीसा वेगळा आहे. यावेळी आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. पहिल्या आठवड्यातील जेलच्या ट्वीस्टवरुन प्रेक्षकांना याचा काहीसा अंदाज आला असेल. पण, तुम्ही विचार करत आहात, बिग बॉस त्याच्याही दोन पाऊलं पुढे आहेत. या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी 10 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यानंतर आता राशन मिळवण्यासाठी दोन सदस्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे किंवा एका सदस्याला एलिमिनेट करावं लागणार आहे.
चुम दरांगने शिवी दिल्यावर अविनाश मिश्राची सटकली
बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही भांडणं आणि राजे पाहायला मिळतात. आज बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्रा आणि चुम दरांग यांच्यात भांडण पाहायला मिळणार आहे. अविनाश मिश्रा आणि चुम दरांग यांच्यात जोरदार बाचाबाची होते, या कारणामुळे घरातील सर्व सदस्य अविनाश मिश्राला घराबाहेर काढण्यासाठी व्होट करतात.
अविनाशला घराबाहेर काढण्यासाठी 10 सदस्यांचं एकमत
बिग बॉस 18 च्या बुधवारच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बसल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावेळी बिग बॉस म्हणतात, 'जर तुम्ही कुटुंबातील सदस्य असाल ज्यांना घरात राशन मिळवून कुटुंबाचं भविष्य चांगलं व्हावं, असं वाटत असेल, तर आता तुम्हाला कुटुंबातील दोन सदस्यांना तुरुंगात टाकावं लागेल किंवा त्यांच्यापैकी एकाला घराबाहेर काढावे लागेल.'
अविनाशला घरातील सदस्यांनी मिळून केलं एलिमिनेट
Tomorrow Promo #BiggBoss18: Avinash get EVICTED from house bcz of HMs votes.pic.twitter.com/OEQyxLRMMi
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 15, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :