Rakul Preet Singh Injured : रकुल प्रीत सिंहसोबत जिममध्ये मोठा अपघात, डेडलिफ्ट करताना पाठीला गंभीर दुखापत
Rakulpreet Singh Injured : जिममध्ये डेडलिफ्ट करताना रकुल प्रीत सिंहच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.
Rakul Preet Singh Injury Update : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसोबत जीममध्ये वर्कआऊट करताना मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिममध्ये व्यायाम करताना रकुल प्रीतच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. वर्कआऊट सेशनमध्ये रकुल 80 किलोचा डेडलिफ्ट करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिच्या पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. रकुलची दुखापत एवढी गंभीर आहे की, गेल्या काही दिवसांपासून ती बेड रेस्टवर आहे.
रकुल प्रीत सिंहला जिममध्ये गंभीर दुखापत
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने दाक्षिणात्या सिनेसृष्टीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही आपली वेगळी छाप पाडली आहे. रकुल प्रील प्रोफेशनल लाइफप्रमाणेच तिच्या पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असते. रकुल प्रीत फिटनेस फ्रीक असून नेहमी जिम आणि योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, रकुल प्रीत वर्कआऊट करताना जखमी झाल्याची माहिती आहे. रकुल प्रीतला गंभीर दुखापत झाली असून आता तिची हेल्थ अपडेट समोर आली आहे.
वर्कआऊट करताना घडला अपघात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, "रकुल गेल्या काही दिवसांपासून बेड रेस्टवर होती आणि परिस्थिती खूपच भयानक बनली आहे. ही घटना 5 ऑक्टोबरच्या सकाळी आहे, जेव्हा रकुल तिची वर्कआउट करत होती. तिने 80 किलो वजनाची डेडलिफ्ट केली. बेल्ट न लावता, त्यामुळे त्याच्या पाठीत पेटके आणि तीव्र वेदना होऊ लागल्या." तथापि, अभिनेत्रीने ते करणे सुरूच ठेवले, ज्यामुळे दुखापत वाढली.
डेडलिफ्ट करताना पाठीला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सर्व प्रकार 5 ऑक्टोबरला सकाळी घडला. रकुल प्रीत तिची कसरत करत होती. त्याने बेल्ट न लावता 80 किलो वजनाची डेडलिफ्ट केली. वेदना असूनही तिने व्यायाम सुरूच ठेवला, त्यामुळे तिच्या पाठीला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दुखापतीमुळे वेदना होत असूनही शूटिंग केलं
रकुल प्रीत अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू आहे. दुखापतीनंतर औषध घेउन रुकलने शूटिंग केलं. तिला दर तीन-चार तासांनी वेदना होत होत्या, तीन दिवस वेदना सहन केल्यानंतर ती फिजिओथेरपिस्टकडे गेली. वाढदिवसाच्या पार्टीच्या एक तास आधी तिला जास्त त्रास होऊ लागला. दुखापतीमुळे रकुलच्या L4, L5 आणि S1 नसा ब्लॉक झाल्या आहेत. तिला औषधासह इंजेक्शन देण्यात आलं असून आता ती हळूहळू बरी होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :