OTT release: श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’, OTT वर या आठवड्यात काय पहाल? संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
ऑक्टोबरच्या मध्यावर आता ओटीटीवर भन्नाट सिनेमे आणि वेबसिरिजचा धमाका पहायला मिळणार आहे. पहा OTT काय रिलिज होणार याची यादी..
OTT release: ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची चांगलीच चंगळ सुरु असल्याचे पहायला मिळते. सणावारांचा महिना आता सुरु झाला आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मोकळ्या वेळेत सिनेमा, वेब सिरिज पाहण्यातली मौजच वेगळी आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक वेबसिरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता श्रद्धा कपूरच्या स्त्री २ सह अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणार आहे. कोणते सिनेमे आणि वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार? पाहूया...
आउटसाइड
तुम्हाला जर हॉरर फिल्म पाहण्याची आवड असेल तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत. अमेरिकन सायकोलॉजीकल भयपटाचं नाव आउटसाइड असं आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून झाँबीने एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
रीता सान्याल
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माची प्रमुख भूमिका असणारी क्राईम थ्रिलर सिरिज सध्या हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. अमित खानच्या प्रसिद्ध काईम कादंबरीवर आधारित असणाऱ्या या सिरिजची सध्या चांगलीच उत्सूकता लागून राहिली आहे. वकीलाच्या भूमिकेत दिसणारी अदा या सिरिजमध्ये दिसणार आहे.
द लिंकन लॉयर
द लिंकन लॉयरचे दोन सिझन सुपरहिट झाल्यानंतर आता या सिझनचा तिसरा सिझन १७ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कोर्टरूम ड्रामावर आधारित असणारी द लिंकन लॉयर या वेबसिरिजबाबात प्रेक्षकांची उत्सूकता ताणून धरली गेली आहे.
श्रिंकिंग सिझन २
श्रिंकिंग सिझन दुसरा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ॲपल टीव्हीवर रिलिज होणारा या वेबसिरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. आज म्हणजे १६ ऑक्टोबरला हा सिझन प्रदर्शित झालाय. जेसन सेहगल, हॅरिसन फोर्ड जिमी लेअर्ड यांच्या भूमिका असणारा हा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहणं मनोरंजनात्मकच ठरणार आहे हे निश्चित.
फॅब्यूलस लाइव्ह्ज वर्सेस बॉलीवूड वाइव्स
‘फॅब्यूलस लाइव्ह्ज वर्सेस बॉलीवूड वाइव्स’ चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल. बॉलीवूड कलाकारांच्या पत्नींचे आयुष्य कसे असते हे या सिरिजमध्ये तुम्हाला पाहता येईल. ही सीरिज तुम्हाला १८ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
स्त्री 2 सह सरफिराही प्रदर्शित
श्रद्धा कपूरच्या स़्त्री 2 सिनेमासह अक्षय कुमारचा सरफिराही सध्या प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांना स्त्री २ सह वरील चित्रपट, वेबसिरिजची मेजवानीच मिळणार आहे.
हेही वाचा:
Shortfilms: 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरपेक्षाही उजव्या ठरतील या शॉर्टफिल्म, हे 5 लघूपट अजिबात चुकवू नका