एक्स्प्लोर
Manager Of Orry Awatramani: ओरीला सेलिब्रिटींचा लकी चार्म बनवणारी 'मिस्ट्री गर्ल', कधीकाळी होती युवराज सिंहची 'लकी गर्ल'; आता बनलीय सेलिब्रिटींची मॅनेजर, ओळखलं का कोण?
Kim Sharma Manager Of Orry Awatramani: ओरी अवत्रामणी (Orhan Awatramani), ज्याला बॉलिवूड सेलिब्रिटींचा लकी चार्म म्हणून ओळखला जातो, त्याच्या यशासाठी एक अभिनेत्री कारणीभूत आहे.

Kim Sharma Manager Of Orry Awatramani
1/12

Kim Sharma Manager Of Orry Awatramani: ओरी अवत्रामणी (Orhan Awatramani), ज्याला बॉलिवूड सेलिब्रिटींचा लकी चार्म म्हणून ओळखला जातो, त्याच्या यशामागील व्यक्तिमत्व म्हणजे, किम शर्मा. ओरीला एक मिस्ट्री बनवून त्याची नेटवर्थ या अभिनेत्री थेट 10 कोटींवर पोहोचवली.
2/12

ओरी अवात्रामणि, ज्याला इंटरनेट जगात ओरी म्हणून ओळखलं जातं. मोठ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणाऱ्या ओरीचे कधी रिहानासोबतचे फोटो व्हायरल होतात तर कधी स्टार किड्ससोबतचे.
3/12

पण हा ओरी अचानक आला कुठून? एका रात्रीत कसा प्रसिद्ध झाला? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. ओरी काय करतो? सगळे सेलिब्रिटी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक का असतात? तो कोट्यधीश कसा झाला? याबद्दल लोकांना अनेकदा प्रश्न पडतात.
4/12

आजच्या काळात त्याची फॅन फॉलोइंग कोणत्याही अभिनेत्यापेक्षा कमी नाही. आता ओरीच्या मॅनेजरनं स्वतः समोर येत,ओरीला अचानक मिळालेल्या ओळखीबाबतचं रहस्य सांगितलं आहे. तिनं फक्त एक खेळी खेळली आणि ऑरी एन्टरटेन्मेट जगतातील चर्चेचा विषय ठरला.
5/12

सर्वात आधी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक प्रसिद्ध अभिनेत्री ओरीची मॅनेजर म्हणून काम करते. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करणारी ही अभिनेत्री. कधीकाळी तिचं नाव तीन प्रसिद्ध व्यक्तींशी जोडलं गेलं होतं. आम्ही किम शर्माबद्दल बोलत आहोत, जिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. पण आता सध्या ती ओरीची मॅनेजर म्हणून काम करतेय.
6/12

मोहब्बतें फेम किम शर्मा ही ओरीच्या यशामागील व्यक्ती. ओरीची मिस्ट्री गर्ल बनून किम शर्मानं आपली एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांवर नेली आहे. अलिकडेच, कुनिका सदानंद सोबतच्या पॉडकास्टमध्ये, किम शर्मा याबद्दल बोलली होती. ओरी काय करतो आणि तिच्या एका खेळीनं तो कसा प्रसिद्ध झाला? याबद्दल तिनं स्पष्टीकरण दिलंय.
7/12

किमनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. 2000 मध्ये तिनं शाहरुख खानच्या रोमँटिक ड्रामा 'मोहब्बतें' मध्ये जुगल हंसराजसोबत काम केले. त्यानंतर ती तुमसे अच्छा कौन है, लेडीज टेलर आणि फिदा सारख्या अनेक चित्रपटांचा भाग होती.
8/12

किमचा शेवटचा चित्रपट लूट होता, जो 2011 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ती काही काळासाठी देश सोडून केनियाला गेली. पण आता किम धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीची एग्झिक्युटिव्ह वाईस प्रेसिडेंट आहे. ही कंपनी ओरी आणि इतर अनेक सेलिब्रिटींचं मॅनेजमेंट करते.
9/12

आता पॉडकास्टमध्ये, किम शर्मा ओरीबद्दल म्हणाली की, "ओरीभोवती तुम्हाला दिसणारं रहस्य आमच्या रणनीतीचा एक मोठा भाग आहे. आम्ही जाणूनबुजून प्रश्नांची उत्तरं देत नाही. मला वाटतं की, तो अलिकडच्या काळातील सर्वात यशस्वी सामाजिक एक्सपेरिमेंट्सपैकी एक आहे. तो खरोखरच एक अतिशय बुद्धिमान आणि टार्गेटेड व्यक्ती आहे."
10/12

ओरी कोण आहे? याबद्दल किम शर्मा पुढे म्हणाली की, ओरी हा इन्फ्लुएंसर नाही. तो खूप प्रभावशाली माणूस आहे आणि एक सेलिब्रिटी आहे.
11/12

किम शर्माच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती तिच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत होती. एक काळ असा होता, जेव्हा तिचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंहसोबत जोडलं गेलं होतं आणि त्यानंतर किम शर्माचं ब्रेकअप झालं. किमचं लिएंडर पेससोबतही रिलेशन होतं, असं म्हटलं जातं.
12/12

किम शर्माचं लग्न केनियातील उद्योगपती अली पुंजानी यांच्याशी झालं होतं आणि ती 2010 मध्ये केनियाला गेली होती. दरम्यान, लवकरच किम शर्माचा घटस्फोट झाला आणि ती भारतात परतली.
Published at : 28 Mar 2025 10:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
आयपीएल
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
