(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nikki Tamboli : प्यार हैं तो हैं... निक्कीने दिली अरबाजबद्दलच्या प्रेमाची कबुली; नात्याबद्दल म्हणाली, "अरबाजने माझ्या आईवडिलांना..."
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी 5 मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं, आता निक्कीने प्रेमाची कबुली दिली आहे.
Nikki Tamboli in Love With Arbaaz Patel : बिग बॉस मराठी सीझन 5 संपला असला तरी, त्यातील सदस्यांची चर्चा मात्र कायम आहे. यंदाच्या सीझनमधील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना निक्की आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा होती. तसेच, अरबाजची गर्लफ्रेंड असल्याच्या आणि त्याचं लग्न झालेलं असल्याच्या अफवाही जोरदार व्हायरल झाल्या होत्या. असं असताना आता निक्कीने अरबाजसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे.
निक्कीने दिली अरबाजबद्दलच्या प्रेमाची कबुली
निक्की तांबोळीने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, मला तो आवडतो. प्रेम आहे तर आहे. त्याने माझ्या आईवडिलांसोबत बोलून सगळं क्लिअर केलंय. तो चांगला मुलगा आहे. आम्ही एकमेकांना समजून घेतोय. एकमेकांची लाइफस्टाइल समजून घेतोय. एकमेकांचं आयुष्य जगण्याची पद्धत कशी आहे आणि पुढे काय करता येईल, याचा विचार करतोय.
प्यार हैं, तो हैं...
निक्की म्हणाली की, "आमच्या नातं मैत्रीच्या पुढचं आहे, याला मी नकार देणार नाही. पण, सध्या आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत, एकमेकांना समजवतोय, एकमेकांचं आयुष्य कसं आहे, हे जाणून घेत आहोत आणि पुढे सर्व कसं करायचं आहे. मला सध्या सर्वांना सांगायचंय की, आमचं नातं अजून ऑफिशियल नाही. पण, मी काही गोष्टी मान्य करणार नाही आणि त्यांना नकारही देणार नाही. मला तो आवडतो. प्यार हैं, तो हैं... आता हे प्रेम मैत्रीचं आहे की, वेगळं आहे हे मला माहित नाही. इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेमाची कबुली दिली आहे".
अरबाजसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली निक्की?
View this post on Instagram
अरबाजने माझ्या आई-वडिलांशी गोष्टी क्लियर केल्या
दुसऱ्या एका मुलाखतीत निक्की तांबोळी म्हणाली की, "अरबाजबद्दल आईला काही गोष्टी समजल्या होत्या, त्याबद्दल अरबाजला जेव्हा समजलं तेव्हा, त्याने माझी टीम आणि आईवडीलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अरबाजने माझ्या आई-वडिलांना भेटून त्यांच्या गोष्टी क्लियर केल्या आहेत. त्याने सांगितलं की, त्याचं लग्न झालेलं नाही". त्याचे काही आधीचे रिलेशन्स होते, ते त्याने क्लियर केल्याचं सांगितलं असल्याचं निक्की म्हणाली. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे सांगितलं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :