Shah Rukh Khan : आरारारा खतरनाक! शाहरुख खानचा शर्टलेस फोटो पाहिलात का? किंग खानचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणाले,"एक ही दिल है कितनी बार जीतोगे"
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील अभिनेत्याच्या फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुखने दमदार कमबॅक केलं आहे. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील अभिनेत्याच्या फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या सिनेमांनी गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमागे शाहरुख खानचा मोलाचा वाटा आहे. अद्याप अभिनेत्याच्या आगामी सिनेमाचं नाव अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. अशातच किंग खानने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्याचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानचा शर्टलेस लूक (Shah Rukh Khan New Look)
शाहरुख खान सध्या आपल्या सिनेमांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. नुकताच अल्लू अर्जुनचा लेक अयान याने किंग खानच्या गाण्यावर डान्स केला होता. आता किंग खानने सोशल मीडियावर आपला नवा लूक शेअर केला आहे. अभिनेत्याचा शर्टलेस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान शर्टलेस फोटो शेअर करत आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडचं प्रमोशन करताना दिसत आहे. शर्टलेस लूकसह अभिनेत्याच्या अंगठ्यांनीदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो शेअर करत किंग खानने मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे.
शाहरुखच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
शाहरुखने फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा शर्टलेस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यार मार ही डालो, एक ही दिल है कितनी बार जीतोगे, सुपरस्टार, शाहरुख खान ग्रेट आहे, खूप-खूप प्रेम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सलमान खान आणि शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच चांगलं होतं. या वर्षात शाहरुखच्या पठाण, जवान या सिनेमांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान आणि शाहरुख खान तब्बल 22 वर्षांनी फुल प्लेज एकत्र काम करणार आहेत.
संबंधित बातम्या
Tiger vs Pathaan : 'टायगर वर्सेस पठाण'च्या तयारीला सुरुवात; जाणून घ्या कधी रिलीज होणार सलमान अन् शाहरुखचा सिनेमा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
