Tiger vs Pathaan : 'टायगर वर्सेस पठाण'च्या तयारीला सुरुवात; जाणून घ्या कधी रिलीज होणार सलमान अन् शाहरुखचा सिनेमा
Tiger Vs Pathaan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'टायगर वर्सेस पठाण' हा सिनेमा 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Tiger Vs Pathaan Release Details : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर वर्सेस पठाण' (Tiger Vs Pathaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. घोषणा झाल्यापासून सलमान शाहरुखचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट आता समोर आली आहे. निर्मात्यांनी आता या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सलमान खान आणि शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे. दोघेही सुपरस्टार असून त्यांच्या नावामुळे सिनेमा चांगला चालेल अशी निर्मात्यांनी आशा आहे.
तीन वर्षांनी रिलीज होणार 'टायगर वर्सेस पठाण' (Tiger vs Pathaan Release Date)
शाहरुख खान वर्षाच्या अखेरीस 'पठाण 2' (Pathaan 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'पठाण 2'सारखीच 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाची कथा असणार आहे. त्यामुळे आधी 'पठाण 2' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 2026 मध्ये 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाच्या शूटिंगसाठी 100 दिवसांचा कालावधी ठेवला आहे. एकंदरीत हा सिनेमा 2027 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'असा' आहे निर्मात्यांचा प्लॅन
'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,टायगर वर्सेस पठाण या सिनेमासाठी खूप तयारी करण्याची गरज आहे. हा बिग बजेट सिनेमा आहे. शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या बड्या कलाकरांसोबत 100 दिवस एका सिनेमाचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे शूटिंगला सुरुवात करण्याआधी निर्माते YFX टीमसोबत 'टायगर वर्सेस पठाण'च्या प्री-विज्युअलायझेशन करणार आहे. तर 2026 मध्ये सलमान-शाहरुख या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करतील. अद्याप निर्मात्यांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सलमान खान आणि शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच चांगलं होतं. या वर्षात शाहरुखच्या पठाण, जवान या सिनेमांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान आणि शाहरुख खान तब्बल 22 वर्षांनी फुल प्लेज एकत्र काम करणार आहेत.
संबंधित बातम्या