एक्स्प्लोर

Madhuri Dixit Diet Plan : अंडी, दही, पालेभाज्या अन् बरचं काही, माधुरी दीक्षितचं हेल्दी डाएट; 'धकधक गर्ल'चा फिटनेस प्लॅन काय? जाणून घ्या...

Madhuri Dixit Fitness Plan : माधुरी दीक्षित समतोल आणि संतुलित आहार करते. तसेच फिटनेसकडेही तिचं लक्ष असतं.

Madhuri Dixit Diet Fitness Plan : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती प्रचंड फिट आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक लहान मोठ्या कुरबुरी सुरू होतात. पण माधुरी आजही डाएट आणि फिटनेसकडे लक्ष देते. त्यामुळे त्याचा तिला फायदा होतो. अनेकांसाठी माधुरी रोल मॉडेल आहे. माधुरीच्या अभिनयाचं, सौंदर्याचं आणि नृत्याचं नेहमीच सर्वत्र कौतुक होत असतं. माधुरी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. स्किन केअर, हेअर केअर आणि डाएटसंदर्भात अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते. 

माधुरी बालपणापासून करतेय व्यायाम

माधुरी दीक्षितच्या फिटनेसचं रहस्य नृत्य (Dance) आहे. नृत्य हा तिच्या व्यायाम प्रकाराचा भाग आहे.  माधुरीला ट्रेडमिलवर चालायला जास्त आवडत नाही. एका वेळेनंतर ट्रेलमिलवर चालायचा तिला कंटाळा येतो. पण नृत्याचा मात्र तिला कधीही कंटाळा येत नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी दीक्षितचा डाएट प्लॅन (Madhuri Dixit Diet Plan)

माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, 'धकधक गर्ल' दिवसाला 5-6 छोटे-छोटे मील्स घेते. एकावेळी जास्त प्रमाणात खाण्यावर ती भर देत नाही. आपल्या डाएटमध्ये ती ताज्या फळांचा समावेश करते. माधुरी दररोज सकाळी उठल्यावर नारळ पाणी प्यायला आवडतं. पण कधीकधी ती कडक चहा किंवा हर्बल टीचं पिते. पण नारळ पाणी हा तिच्या डाएटचाच भाग आहे. कोल्डड्रिंक, दारू, सिगरेट या गोष्टींपासून ती दूर आहे. आपल्या डाएटमध्ये माधुरी अंडी, आक्रोड, दही, पालक, हिरव्या भाज्यांचा समावेश करते. प्रोटीन, आर्यन आणि शरीराला जीवनसत्व कसे मिळतील याकडे तिचं लक्ष असतं. 

माधुरी दीक्षित फिटनेस प्लॅन (Madhiri Dixit Fitness Plan)

माधुरी दीक्षित घरीच व्यायाम करायला पसंती देते. नेहमीच ती कथ्थक आणि व्यायामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच पतीसोबत योगा करायला तिला आवडतं. माधुरीचा लेक एरिन तबला वाजवतो आणि माधुरी त्यावर डान्स करत असते. शरीराला तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे, असं माधुरीला वाटतं. माधुरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असते. संतुलित आहार आणि व्यायामासोबत माधुरी चांगली झोपदेखील घेते. त्यामुळे तिच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. माधुरीला मॉर्निंग वॉक आवडतो. 

संबंधित बातम्या

Fashion : 50 व्या वर्षीही दिसाल सुंदर अन् तरुण! 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे हे लूक ट्राय करा, मग बघा कमाल..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; भादोलेत रिल स्टारनं विजय खेचला, कागलात मंडलिक गटाचे पानिपत
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; भादोलेत रिल स्टारनं विजय खेचला, कागलात मंडलिक गटाचे पानिपत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओ

ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; भादोलेत रिल स्टारनं विजय खेचला, कागलात मंडलिक गटाचे पानिपत
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; भादोलेत रिल स्टारनं विजय खेचला, कागलात मंडलिक गटाचे पानिपत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
भाजप, राष्ट्रवादीपासून शिवसेना काँग्रेसपर्यंत...; कुणाला किती जागा?, जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget