एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert

गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान राहिले. कोठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 35अंशांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापामात चढउतार दिसून उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. किमान व कमाल तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारीतच तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले जात आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात 1-2 अंशांनी तापमान कमी होणार असून त्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय.महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होणार असून, त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात पुढील तीन दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा बदल होणार नाही. विदर्भात मात्र पुढील 72 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होईल, असे हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे.

राज्यात तापमानाचा पारा कसा?

गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान राहिले. कोठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 35अंशांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे 36.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर आणि वर्धा येथेही कमाल तापमान 36.9अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. पुण्यात काही ठिकाणी तापमान 37अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान 27अंश सेल्सियस नोंदवले गेले.

बुधवारी (12 फेब्रुवारी) ला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान तुलनेने उष्ण राहिले, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडीशी गारठा जाणवला. सर्वात कमी तापमान शाहदा (नंदुरबार) येथे 12.5अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले, तर लोनिकांलबोर (पुणे) येथे 12.6अंश सेल्सियस तापमान राहिले. कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्ये किमान तापमान तुलनेने जास्त होते. मुंबई कोलाबा येथे 21.1अंश, तर रत्नागिरी येथे 21.1अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

पहाटे गारवा वाढला

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पहाटे गारठा जाणवत होता. मात्र, दुपारी उष्णतेच्या झळा कायम होत्या. येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान साधारण असेच राहणार असून पहाटे गारवा जाणवणार आहे. काही भागात हलक्या धुक्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसणार असून कमाल तापमान चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा:

Horoscope Today 13 February 2025 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान, दत्तगुरुंचा लाभणार आशीर्वाद; आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget