एक्स्प्लोर

Thackeray Camp & Shinde Camp: मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्येही पक्षाला लागली गळती

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का. ठाकरेंचे नगरसेवक आणि बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार. ठाण्यात राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाणे:  मीरा भाईंदर शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे मिरा भाईंदरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

नाशिकच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी बुधवारी ठाकरे गटातील नाशिकच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सभापती पवन पवार आणि  मनसेचे माजी नगरसेवक सभापती योगेश शेवरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. कालच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी  नाशिकचे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे यांच्या निवासस्थानी जमले होते. उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात अजून कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

राजन साळवी यांचा ठाण्यात पक्षप्रवेश, हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल

राजन साळवी यांच्या आज शिंदे गटात होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी लांजा, राजापूर, साखरपा या भागातील त्यांचे हजारो कार्यकर्ते बुधवारी रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.  यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नावाचा जयघोष केला. आज हे सर्व कार्यकर्ते साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी हजर राहणार आहेत. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून ठाण्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांना शिवसेनेत योग्य ते सन्मान मिळेल, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी व्यक्त केली.

राजन साळवी काय म्हणाले?

राजन साळवी यांच्या आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी किरण सामंत आणि राजन साळवी यांची बैठक पार पडली. रात्री तब्बल दोन तास बैठक सुरु होती. यानंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही.. परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. आजच्या या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत.

सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले. 

मोठी बातमी, एकनाथ शिंदेंच्या सत्कारासोहळ्याला जाणं शरद पवारांनी टाळायला हवं होतं, उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
Embed widget