Adipurush : 'आदिपुरुष'च्या रिलीजआधी कृती सेनन नाशकात; सीता गुफा आणि काळाराम मंदिरात जाऊन घेतलं सीता मातेचं दर्शन
Adipurush : 'आदिपुरुष'च्या रिलीजआधी कृती सेननने नाशिकमधील प्राचीन सीता गुफा आणि काळाराम मंदिरात जाऊन सीतामातेचं दर्शन घेतलं आहे.
Kriti Sanon Visit Temple Before Adipurush Release : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा सिनेमातील लूक आऊट करण्यात आला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्री नाशकात दाखल झाली आहे.
कृती सेनन पोहोचली नाशिकच्या पंचवटीत
'आदिपुरुष' सिनेमासंदर्भात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता अभिनेत्री कृती सेनन सिनेमाच्या रिलीजआधी नाशिकच्या पंचवटीत पोहोचली आहे. तिने नाशिकमधील प्राचीन सीता गुफा आणि काळाराम मंदिरात जाऊन सीतामातेचं दर्शन घेतलं आहे. सीता गुंफा आणि काळाराम मंदिरातील कृतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती 'राम सिया राम' म्हणत आरती करताना दिसत आहे.
'आदिपुरुष' या सिनेमातील 'राम सिया राम' हे गीत नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गीताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान कृती सेनन 'राम सिया राम' या गीताचे गायक सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांच्यासोबत नाशिकच्या पंचवटीत पोहोचली होती. त्यावेळी तिने सीता मातेचं दर्शन घेण्यासोबत सिनेमातील 'राम सिया राम' या गीतावर आरतीदेखील केली.
View this post on Instagram
चाहत्यांकडून कृतीचं कौतुक!
कृती सेननचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर 'जय सिया राम','जय श्रीराम' अशा कमेंट्स चाहते करत आहेत. तर दुसरीकडे सिनेमासाठी कोणत्याही थराला जाणार का?, सिनेमा रिलीज होताना देव आठवतो का?", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत".
16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आदिपुरुष' (Adipurush Released Date)
'आदिपुरुष' हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या