Entertainment News Live Updates 13 october: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Entertainment News Live Updates 13 october: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर! Entertainment News Live Updates 13 october: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/313e1beab98940bbf63b912a5798b88e1665625049874373_original.jpg)
Background
Chal Ab Wahan: ‘चल अब वहाँ’; वैभव आणि पूजाकडून चाहत्यांना सरप्राइज; हिंदी अल्बम होणार रिलीज
Chal Ab Wahan: गेल्या काही दिवसांपासून वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ (Chal Ab Wahan) या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात रंगणार कॅप्टन्सी कार्य; जो गाडी व्यवस्थित करणार पार्क, तोच ठरणार 'पार्किंगचा किंग'
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. या टास्कमध्ये कोण विजयी होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
View this post on Instagram
Urvashi Rautela: 'आधी इराणमध्ये आणि आता भारतात...'; उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत
Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.
View this post on Instagram
Sonu Sood: मदतीसाठी चाहत्यांची गर्दी; भोवळ येऊन पडलेल्या महिलेला सोनू सूदने दिलं पाणी
Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला रिप्लाय देऊन सोनू त्यांना मदत देखील करतो. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूच्या घराबाहेर लोकांची गर्दी दिसत आहे.
View this post on Instagram
Mili Teaser: 'फ्रिजर रुम' मध्ये अडकलेल्या तरुणीची गोष्ट; जाह्नवी कपूरच्या 'मिली'चा टीझर पाहिलात?
Mili Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवीच्या ‘गुड लक जेरी’, 'रुही' आणि ‘धडक’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जान्हवीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जान्हवीचा मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
पाहा टीझर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)