Crime News: विद्यार्थिनीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी चप्पलेने बदडले
Crime News: विद्यार्थीनीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. या विद्यार्थीनीसोबत शिक्षकाचे संबंध होते. तिचे लग्न मोडण्यासाठी शिक्षकाने तिचे फोटो व्हायरल केले.

Crime News: विद्यार्थिनीला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या शारीरीक शिक्षणाच्या शिक्षकाला जमावाने बेदम मारहाण केली. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव महेश शिवलिंगप्पा बिरादार (४४) असे आहे. आरोपी शिक्षक हा सौंदत्ती तालुक्यातील यक्कुंडी गावातील सरकारी हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला फूस लावून आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर या अल्पवयीन मुलीसोबत त्याने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. ही पीडित विद्यार्थीनी दहावीला येईपर्यंत शिक्षकाने तिच्याशी संबंध ठेवले होते. या दरम्यान आरोपी शिक्षकाने तिच्यासोबत नको त्या अवस्थेत फोटोही काढले होते.
दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पीडित मुलीने कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. या मुलीचे लग्न ठरल्यानंतर हे लग्न मोडण्यासाठी आरोपी शिक्षकाकडून हालचाली सुरू झाल्या. आरोपीने हे लग्न मोडण्यासाठी तिच्यासोबत असलेले अश्लील फोटो व्हॉट्स अॅप स्टेट्सवर ठेवले. ही पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेतली. यावेळी त्यांनी शिक्षकाला शिविगाळ करत शिक्षकाला चप्पलेने बेदम मारहाण केली.
या प्रकरणी सौंदात्ती पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- बीडमध्ये नामांकित क्लासेस चालकाच्या आत्महत्येने खळबळ, दोन दिवसांपूर्वीच केले क्लासेसचे उद्घाटन, नैराश्य की आणखी काही?
- Bhiwandi Crime News : आधी बेदम मारहाण, नंतर बेशुद्ध पत्नीला जीवंत जाळलं; फरार पती पोलिसांच्या ताब्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
