माजी SEBI प्रमुख दामोदरन यांना न्यायालयाचा मोठा दणका, ठोठावला 206 कोटींचा दंड; नेमकं प्रकरण काय?
माजी SEBI प्रमुख एम दामोदरन (M Damodaran) यांना आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयानं (International Court of Arbitration) मोठा दणका दिला आहे. न्यायालयानं त्यांना 206 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय.

M Damodaran SEBI News : माजी SEBI प्रमुख एम दामोदरन (M Damodaran) यांना आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयानं (International Court of Arbitration) मोठा दणका दिला आहे. न्यायालयानं त्यांना 206 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अपहेल्थ आणि ग्लोकल हेल्थकेअर (Glocal Healthcare Systems) या कंपन्यांसंदर्भातील एका कराराच्या खटल्याचा भंग केल्यामुळं न्यायालयानं हा दंड ठोठावला आहे. एम दामोदरन हे अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
अपहेल्थ या कंपनीने आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयानकडे (International Court of Arbitration) ग्लोकल हेल्थकेअर (Glocal Healthcare Systems) या कंपन्यांसंदर्भात तक्रार केली होती. अपहेल्थ या कंपनीने ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीमधील 94.81 टक्के स्टेक खरेदी करण्यासाठी 2100 कोटी रुपये दिले होते. यासदंर्भातील करार पूर्ण झाला होता. ठरलेल्या कराराप्रणाणे 2100 कोटी रुपयांची रक्कमही देण्यात आली होती. मात्र, ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीच्या प्रवर्तकांनी हस्तांतरीत केले नाही, त्यांचे अधिकार राखून ठेवले होते. ग्लोकल हेल्थकेअरने केलेल्या आर्थिक व्यवहारासंदर्भात देखील माहिती दिली नाही. या सर्व गोष्टीमुळं अपहेल्थ या कंपनीने आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयानकडे याची तक्रार केली होती.
न्यायालयाने दामोदरन यांच्यासह इतर संचालकांना 920 कोटी रुपयांचा दंड ठोठावला
दरम्यान, आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने एम दामोदरन यांना जरी 206 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असला तरी, न्यायालयाने एकूण 920 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड दामोदरन यांच्यासोबतच ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीचे इतरही संचालक, प्रमुख भागधारक, प्रवर्तक यांना ठोठावला आहे. मिळालेल्या माहितनुसार एम दामोदरन हे ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीचे भागधारक होते. त्यांना या कंपनीचा करार झाल्यानंतरही यावरील नियंत्रण सोडले नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे. दामोदरन हे अनेक भारतीय कंपन्यांच्या बोर्डामध्ये संचालक म्हणून आहेत.
ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीने फसवणूक केल्याचा अपहेल्थ कंपनीचा आरोप (Glocal Healthcare Systems)
अपहेल्थ या कंपनीने ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीच्या विरोधात गुन्हेगारीसह फसवणुकीचा आरोप केला आहे. दरम्यान, आम्ही कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नाही. यांदर्भातील कोणताही पुरावा नसल्याचे ग्लोकल हेल्थकेअर या कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची सध्या शिकागो न्यायालयात सुनावनी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
SEBI : सेबीकडून गुंतवणूकदारांना गुड न्यूज! ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी खात्यात पैसे जमा होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
