एक्स्प्लोर

BLOG | मुंबईला आणि महाराष्ट्राला पर्याय येईल?

2011 ते 2013 या काळात मी अहमदाबादला होतो. त्या काळात आजचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2012 ला जेव्हा ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा अचानक "गुजरात मॉडेल"ची चर्चा भारतीय मीडिया करू लागला. परदेशातल्या प्रगत शहरांचे फोटो अहमदाबादचे म्हणून भाजपचा IT सेल सोशल मीडियात फिरवत होता, आणि लोक त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत होते.

2011 ते 2013 या काळात मी अहमदाबादला होतो. त्या काळात आजचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2012 ला जेव्हा ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा अचानक "गुजरात मॉडेल"ची चर्चा भारतीय मीडिया करू लागला. परदेशातल्या प्रगत शहरांचे फोटो अहमदाबादचे म्हणून भाजपचा IT सेल सोशल मीडियात फिरवत होता, आणि लोक त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत होते. Vibrant Gujarat च्या आयोजनात देशी-विदेशी कंपन्यासोबत काही लाख करोड रुपयांचे MoU झाले अशा बातम्या येत, पण मीडियाला MoU आणि Agreement मधला फरक कळत नसल्याने तो आता अहमदाबाद न्यूयॉर्क किंवा बीजिंगच्या सारखे बनणार अशा थाटात देत होता. MoU करण्यास कुणालाही काहीही द्यावे किंवा घ्यावे लागत नाही. मी वैयक्तिक एक छोटी कंपनी काढून कुठल्याही सरकारशी किंवा दुसऱ्या कंपनीशी हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा MoU करू शकतो, भले माझ्या कंपनीकडे हजार रुपये का नसेना! Vibrant Gujarat मध्ये तर शाळेतल्या मास्तर लोकांनाही सूट बनवून उद्योगपती म्हणून बसवले गेल्याच्या बातम्याही होत्या.

2012 आणि 2013 च्या IIM Ahmedabad च्या प्लेसमेंट मी जवळून पाहिल्या. 2013 ला माझ्या बॅचमधले 350 लोकांमधले फक्त दोघेजण अहमदाबाद मध्ये नोकरीला लागले, बाकी सगळे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर इथे गेले. IIM मधले जॉब्स हे कॉर्पोरेटमधले वाढीव पगाराचे असल्याने मी या आकड्यांनाही दुर्लक्षित केले. पण माझ्या ओळखीच्या, ऐकिवात असलेल्या एक माणसाचा अपवाद सोडून (जो माझ्यासारखाच फक्त त्याच्या बायकोच्या उच्च शिक्षणापुरताच तिथे आला होता) दुसरे कुणीही अहमदाबादला नोकरीसाठी आल्याचे समजतच नव्हते. केंद्र सरकारी बँका सोडल्या (ज्यात सक्तीची परराज्यात बदली असते) तर कुठेच गैरगुजराती माणूस अहमदाबादला नोकरी किंवा व्यवसाय करायला आल्याचे दिसतच नव्हते. एखादे शहर जर आर्थिक प्रगतीचे केंद्र होत असेल तर परराज्यातले लोक तिकडे स्थलांतर करतात, हे साधे अर्थशास्त्र आहे. आणि गुजरात मॉडेलची फसवेगिरी इथेच लक्षात येते.

आता मुंबईवरचा आकस म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये जागतिक दर्जाचे सिनेनिर्मीती केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेचे स्वागतच आहे कारण मुंबईने किती काळ उत्तर भारतीय (गुजराती पकडून) लोकांचे लोंढे स्वतःमध्ये सामावून घ्यावे यालाही मर्यादा आहेच. पण ही घोषणा करताना मुंबई आज जिथे दिमाखात उभी आहे त्याला कारण काय आहे याची आदित्यनाथ यांना कल्पना नसावी. ब्रिटिशांनी मुंबईला खऱ्या अर्थाने औद्योगिक आणि व्यापारी शहर बनवले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मुंबईतले वातावरण कापडाच्या गिरण्यांसाठी आदर्श असल्याने आणि सोबत तिथे बंदर असल्याने ब्रिटिशांनी मुंबईवर विशेष प्रेम केले. उत्पादन आणि व्यापार या दोन्ही गोष्टींसाठी त्यांना मुंबई ही सगळ्यात योग्य जागा होती. कलकत्त्यापेक्षाही मुंबई त्यांना पश्चिमेकडे व्यापार करण्यासाठी सोयीस्कर होती. आणि लुटीयनची दिल्ली फक्त प्रशासकीय राजधानी म्हणून त्यांनी उपयोगात आणली होती.

ब्रिटिश गेल्यानंतर जेव्हा मराठी लोकांनी रक्त सांडून मुंबईसह महाराष्ट्र बनवला, तेव्हा या महाराष्ट्राने मुंबईची मिश्र संस्कृती आणि व्यापार-उदीम जपून ठेवला. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातला दक्षिण भारतीय लोकांना झालेला विरोधही प्रामुख्याने रेल्वेमधील नोकऱ्यांच्या अनुषंगाने होता, नंतर तोही गळून पडला. कुठलेही शहर व्यापारी केंद्र बनण्यासाठी काही भौगोलिक गोष्टींसोबतच तिथली कायदा-सुव्यवस्था ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट असते. मुंबईत ही कायदा सुव्यवस्था गेली दोन शतके अबाधित आहे. मुंबईत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्या कुठेही, कधीही मुक्तपणे सरकारी आणि खासगी वाहनाने सुरक्षितपणे संचार करू शकतात (मुंबई पोलिसांचे यासाठी अभिनंदन), म्हणून इथे स्रीरूपी अधिकचा काम करणारा वर्ग उपलब्ध होतो, जो मुंबईच्या सुबत्तेत पुरुषांइतकीच भर टाकतो. दुसऱ्या बाजूला गुडगाव किंवा नोएडामध्ये आजही संध्याकाळी 7 नंतर मुली किंवा स्त्रिया एकट्याने बाहेर पडू शकत नाहीत.

उत्तर भारतीय राज्यांमध्ये आजही तुमचे आडनाव आणि जात एकच असते म्हणून तुम्ही काहीही व्यवसाय किंवा नोकरी करायला गेला की तुमची जात आडवी येतेच. मुंबईत cosmopolitan समाज असल्याने इथे लोकांना जाती-धर्म किंवा भाषा यांच्याशी घेणेदेणे नसते, तर फक्त कामाशी मतलब असतो. म्हणून ज्याला स्वतःची ओळख स्वतःच्या कामातून घडवायची आहे त्याला उत्तर भारत सोडून मुंबईला यावेच लागेल. मुंबईत मोलमजुरी करणारे बहुसंख्य उत्तर भारतीय हे खालच्या जातीतील आहेत. ज्यांना त्यांच्या गावात जमिनीही नाहीत आणि कामाची, जीवाची किंवा अब्रूची शाश्वतीही नाही. अशा असंख्य लोकांना मुंबई स्वतःमध्ये सामावून घेते आणि माणूस म्हणून जगायची संधी देते. कुणी श्रीमंत आहे म्हणून त्याला जीवाची किंवा लुटला जाण्याची भीती मुंबईत नाही, आणि कुणी गरीब आहे म्हणून त्याला उपाशी मरण्याची भीतीही मुंबईत नाही.

मुंबईने लोकांची जात-धर्म-प्रांत-भाषा न पाहता त्यांच्या कर्मावर त्यांची स्वप्ने पुरी करण्याची संधी दिली, मग तो दिल्लीतून आलेला शाहरूख असो की UP मधून आलेले नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी असोत. मुंबई ज्या सुरक्षिततेने आणि स्वतंत्रतेने, तुमची ओळख न विचारता तुम्हाला ओळख बनवायची आणि आयुष्य जगायची संधी देते ती संधी तुम्हाला नोएडा किंवा अहमदाबाद कधीही देणार नाही. आपल्या ओळखीतले किती लोक अहमदाबाद किंवा दिल्ली NCR मध्ये खासगी नोकरीसाठी जातात हे पाहिलं तर सहज कळतं की स्थलांतर आजही मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे होतं, इथून बाहेर उत्तरेकडे शक्यतो कुणी जात नाही, कारण उत्तरेने अजून cosmopolitan बनण्याकडे पाऊलही टाकले नाहीये. उत्तरेने ते पाऊल टाकावे आणि स्वतःचा, स्वतःच्या लोकांचा खरा विकास घडवून आणावा ही त्यांना शुभेच्छा! मुंबईची आणि महाराष्ट्राची रेष छोटी करण्यापेक्षा स्वतःची वेगळी मोठी रेष मारून दाखवावी एवढीच अपेक्षा.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर;  कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Embed widget