Mohammed Rizwan Rebukes Shaheen Afridi : भर मैदानात कर्णधाराला राग अनावर, शाहीन आफ्रिदी अन् मोहम्मद रिझवान भिडले VIDEO
Mohammed Rizwan Rebukes Shaheen Afridi : भर मैदानात कर्णधाराला राग अनावर, शाहीन आफ्रिदी अन् मोहम्मद रिझवान भिडले VIDEO

Mohammed Rizwan Rebukes Shaheen Afridi : चॅम्पियन्स ट्रॉफीला आज (दि.19) सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमने-सामने होते. या सामन्यात यजमान पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. टॉम लेथम (118) आणि विल यंग (107) शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 321 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या 260 धावांवर ऑल आऊट झालाय.
शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवानमध्ये मोठा वाद
न्यूझीलंडच्या संघाकडून टॉम लेथम फलंदाजी करत असताना शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला. त्याने लेथमसमोर चांगला चेंडू टाकला. मात्र, चेंडू सीमारेषेबाहेर गेला. शाहीनने योग्य प्रकारे आणि अचूक मारा केला होता. मात्र, तरिही रिझवान आणि शाहीनमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. शाहीनच्या दिशेने काहीतरी हातवारे करत रिझवान खूपच आक्रमक होता. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार गप्प बसला नाही आणि जोरदार प्रत्युत्तर दिले.
विल यंग आणि टॉम लॅथमची शतकी खेळी
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून विल यंग आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या मदतीने 39 धावांची सुरुवात मिळाली. अबरार अहमदने ही भागीदारी मोडली आणि कॉनवेला 10 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. यानंतर, केन विल्यमसन देखील 1 धाव करून पॉवरप्लेमध्ये बाद झाला. यंग आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने संकटात सापडलेल्या न्यूझीलंडच्या डावाची जबाबदारी घेतली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि धावसंख्या 191 पर्यंत नेली. यंगने 113 चेंडूत 107 धावा करत शानदार शतक झळकावले. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार होता. लॅथमने शतकही झळकावले आणि 104 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 118 धावांची नाबाद खेळी केली. ग्लेन फिलिप्सही स्फोटक फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने 39 चेंडूत 61 धावांची खेळीही केली. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
pic.twitter.com/ZzvF5snqiY
— BlueGreen Planet (@De_le_Vega) February 19, 2025
Shaheen Afridi gives it back to Mohammad Rizwan after Pakistan captain argues needlessly
The incident took place in the 47th over. New Zealand, placed smoothly at 265/4, had a close shave when a ball from Shaheen beat Latham, but took the outside edge for…
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
