champions trophy india vs Bangladesh: भारत Vs बांग्लादेशच्या सामन्यापूर्वी आनंदाची बातमी, मनसेच्या आंदोलनाला यश; Hotstar वर मराठी कॉमेंट्री सुरु
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हॉटस्टार कार्यालयात पोहोचले होते आणि त्यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Champions Trophy India vs Bangladesh: पाकिस्तानने आयोजित केलेल्या चॅम्पियन ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. जगाभरातील क्रिकेटवेड्यांसाठी ही पर्वणीच आहे. मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळली जात आहे. अशातच भारत Vs बांग्लादेशच्या सामन्यापूर्वी मराठी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. क्रिकेटप्रेमींना आता मराठीतही कॉमेंट्रीचा पर्याय उपलब्ध झालाय. भारतात या सामन्यांचे प्रक्षेपण स्पोर्ट्स 19 आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर थेट प्रक्षेपित केले जातील. तसेच, JioHotstar ॲपवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग देखील उपलब्ध असेल. (Champions trophy india vs Bangladesh)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश आले असून हॉटस्टारवर आता प्रेक्षकांसाठी मराठी कॉमेंट्री चा पर्याय चॅम्पियन्स ट्रॉफी साठी उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हॉटस्टार कार्यालयात काही दिवसापूर्वी जाऊन मराठी कॉमेंट्री पर्याय प्रेक्षकांना द्यावा अशा प्रकारची मागणी केली होती. इतर सर्व भाषांचा कॉमेंट्री पर्याय हॉटस्टार वर उपलब्ध असताना मराठी कॉमेंट्री चा पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र आता हॉटस्टारने मनसेच्या मागणीनंतर आजपासून सुरू झालेल्या चॅम्पियन स्ट्रॉफीच्या मॅचेसदरम्यान मराठी कॉमेंट्रीचा पर्याय प्रेक्षकांसाठी दिला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मराठी क्रिकेटप्रेमींना आता मातृभाषेत चॅम्पियन ट्रॉफीचा रोमांच अनुभवता येणार आहे. (MNS)
हॉटस्टारच्या ऑफिसमध्ये जात मनसेची नाराजी
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हॉटस्टार कार्यालयात पोहोचले होते आणि त्यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. क्रिकेट सामने मराठीत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.जर इतर भाषांमध्ये भाष्य केले जात असेल तर मराठी भाषेत का नाही? असा सवाल करत त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हॉटस्टारला एक पत्र दिले होते ज्यामध्ये असे म्हटले होते की भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या सामन्यांची कॉमेंट्री भारतातील इतर राज्यांसाठी प्रादेशिक भाषेत केले जात आहे, परंतु मराठीत केली जात नाही. यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या क्रिकेटप्रेमींना मराठीमधून कॉमेंट्री ऐकत मॅचचा आनंद घेता येणार आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

