एक्स्प्लोर

EPF: मोठी बातमी, पीएफचे पैसे यूपीआयवरुन काढता येणार, तीन महिन्यात सुविधा सुरु होणार, ईपीएफओची NPCI शी चर्चा  

EPFO: ईपीएफओ खातेदारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. ईपीएफ खातेदारांना त्यांच्या पीएफची रक्कम लवकरच यूपीआयद्वारे काढता येणार आहेत. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ईपीएफओ खात्यातील रक्कम वर्ग करण्याची किंवा पीएफ खात्यातून काढून घेण्याची प्रक्रिया यूपीआयद्वारे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यूनिफाईड पेमेंटस इंटरफेसद्वारे पीएफ खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार ईपीएफओनं एनपीसीआयसोबत चर्चा सुरु केली आहे. 

ईपीएफओची एनपीसीआयसोबत चर्चा

यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भातील योजना राबवण्यासाठी ईपीएफओनं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत चर्चा सुरु केली आहे. यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा येत्या तीन महिन्यांमध्ये उपलब्ध होईल. ईपीएफओच्या 7 कोटी 40 लाख सब्स्क्रायबर्सला चांगली सेवा देण्यासाठी यूपीआय सुविधा उपलब्ध  करुन दिली जाणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार एकदा ईपीएफ यूपीआयशी लिंक केल्यानंतर खातेदार डिजीटल वॉलेटच्या पर्यायाद्वारे क्लेम केलेली रक्कम वापरु शकतात. ईपीएफओ पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आरबीआय आणि व्यापारी बँकांच्या मदतीनं डिजिटल सिस्टीमची फेररचना करत आहे. 

ईपीएफ खात्यातील रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत यूपीआयचा समावेश केल्याचा फायदा दुर्गम भागातील सबस्क्रायबर्सला होऊ शकतो. गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये ईपीएफओकडून अनेक लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. पेन्शन सेवेमध्ये सुधारणा, क्लेम मंजुरीची प्रक्रियेला दिशा देणे यासाठी माहिती तंत्रज्ञान यंत्रणा  विकसित करण्याचे काम सुरु आहे. 

ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5 कोटी क्लेम मंजूर केले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. या क्लेमच्या माध्यमातून ईपीएफओनं 2.05 लाख कोटी रुपये खातेदारांना दिले आहेत. आर्थिक वर्ष 23-2024 मध्ये  4 कोटी 45 लाख  क्लेम सेटल करण्यात आले होते. त्याद्वारे खातेदारांना 1.82 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. 

ऑटो सेटलमेंट प्रोसेसद्वारे केवळतीन दिवसात क्लेम सेटल केले जात आहेत.1 कोटी 87 लाख क्लेम ऑटो सेटेलमेंटद्वारे मंजूर करण्यात आले आहत. केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी क्लेम ट्रान्सफर प्रक्रिया सोपी केली असल्याचं म्हटलं. आता केवळ 8 टक्के दाव्यांमध्ये नियोक्त्याच्या साक्षांकनाची परवानगी लागेल. 

ईपीएफओची रक्कम काढण्यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. ईपीएफओ खातेदाराला एटीएम कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाईल. याद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम एटीएम कार्डवरुन काढली जाणार आहे. ईपीएफओ 3.0 लाँच होईल तेव्हा अनेक बदल झालेले दिसून येतील. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
एआय तंत्रज्ञानाचा मोठा फटका! एकाच वेळी 8000 कर्मचाऱ्यांना नारळ, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय 
एआय तंत्रज्ञानाचा मोठा फटका! एकाच वेळी 8000 कर्मचाऱ्यांना नारळ, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय 
Petrol Diesel Jalna : पेट्रोल-डिझेलबाबत जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश; कॅन, बाटलीत पेट्रोल देण्यास बंदी, 5 टक्के साठा सरकारी वाहनांसाठी राखीव
Petrol Diesel Jalna : पेट्रोल-डिझेलबाबत जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश; कॅन, बाटलीत पेट्रोल देण्यास बंदी, 5 टक्के साठा सरकारी वाहनांसाठी राखीव
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
PM Modi Melody: तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे शेअर मार्केटमध्ये पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागला, नेमकं काय घडलं, वेगळंच सत्य समोर?
तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट मात्र वेगळंच सत्य समोर
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Embed widget