Marathi Actress On Shiv Jayanti: "लायकी नसताना कपाळावर चंद्रकोर मिरवत..."; मराठमोळ्या अभिनेत्रीची खोचक पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Marathi Actress On Shiv Jayanti: मराठमोळ्या अभिनेत्रीनं शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना केलेल्या पोस्टमुळे सध्या ती चर्चेत आहे.

Marathi Actress On Shiv Jayanti: संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांची ही 395वी जयंती. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. तर, काही ठिकाणी शिवरायांचा पराक्रम सांगणारे मोठमोठे देखावे उभारण्यात आले होते. अनेकांनी एकमेकांना 'शिवजयंती'च्या शुभेच्छा (Shiv Jayanti 2025) दिलेल्या. यामध्ये मराठी कलाकार कसे मागे राहतील. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन 'शिवजयंती'च्या शुभेच्छा दिल्या. अशातच एका मराठी अभिनेत्रीनं केलेली पोस्ट मात्र चर्चेत आहे.
'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेखिका नेहा शितोळेनं (Neha Shitole) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेहा शितोळेनं शिवजयंती निमित्त केलेल्या खोचक पोस्टची चर्चा सगळीकडे होत आहे. बिग बॉस मराठी फेम नेहा शितोळेनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. नेहानं आपल्या पोस्टमध्ये आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना शिवरायांच्या चरणी केली आहे.
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये नेहानं म्हटलं आहे की, "एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या पण आज फेटे बांधून, नऊवारी साडी नेसून, लायकी नसनाताही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा (ओरडत, ओरबाडत ) नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉनचे कर्कश्य आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथट करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना…"
मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये दिसून आली होती. नेहानं अनेक नाटकं, मालिका, सिनेमे, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आपल्या सर्वोत्तम अभिनयाच्या जोरावर नेहानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस मराठी सीझन 2 मध्येही नेहा शितोळेनं फायनल गाठली होती. पण, ट्रॉफीपासून काही पावलं दूर राहिली होती. फक्त मराठी सिनेसृष्टीच नाहीतर, नेहानं हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी छाप सोडली आहे. अशातच आता शिवजयंतीनिमित्त केलेल्या परखड आणि खोचक पोस्टमुळे नेहा शितोळे चर्चेत आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

