(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 91 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने घातली खिशात
IND vs SL T20 : भारतानं श्रीलंका संघाला तिसऱ्या टी20 सामन्यात मात दिली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्या धमाकेदार शतकाच्या जोरावर भारताचा विजय सोपा झाला.
India vs Sri Lanka, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं धावांनी विजय मिळवत सामना जिंकला आहे. तसंच तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकाही 2-1 अशा फरकानं नावावर केली आहे. सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 228 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर 229 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाला 16.4 षटकांत 137 धावाच करता आल्या, ज्यामुळे भारत 91 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाबाद 112 धावा केल्या तर अर्शदीप सिंहने 3 आणि उमरान मलिक, हार्दिक पांड्या, चहल यांनी प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.
सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभारण्याचा निर्धार केला होता. भारतीय फलंदाजानी दमदार फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारली. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 112 धावा केल्या. सूर्याने 51 चेंडूत 9 षटकार 7 चौकार ठोकत नाबाद 112 धावा केल्या. सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन बाद झाल्यावर राहुल त्रिपाठीने छोटी पण स्फोटक खेळी केली. 35 धावा करुन तो बाद झाला. मग सूर्या आणि गिलने डाव सावरला. गिल 46 धावा करुन बाद झाला. मग पांड्या आणि हुडा स्वस्तात बाद झाले. अक्षरच्या नाबाद 21 धावांनी भारताची धावसंख्या 228 पर्यंत नेली.
ज्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आल्यापासून एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. एकही फलंदाज 30 हून अधिक धावसंख्या करु शकला नाही. कुसल मेंडिस आणि दासून शनाका यांनी सर्वाधिक 23 धावा केल्या. पण 229 हे मोठे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने एकाही फलंदाजांने खास फलंदाजी केली नसल्याने अखेर श्रीलंकेचा संघ 91 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात विजयासह भारताने मालिकाही 2-1 अशी जिंकली आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा-