CRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार
CRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार
सरकारी अधिकारी वरकमाईसाठी कोणते प्रताप करतात याचं उदाहरण म्हणजे नुकताच समोर आलेला सीआरझेड घोटाळा. धनाढ्यांच्या फायद्यासाठी सीआरझेड नकाशात फेरफार करून काही अधिकाऱ्यांनी मुंबईजवळ गरिबांच्या जमिनी बळकावल्या.
असा झाला सीआरझेड घोटाळा...
-------------------------------------
भूमी अभिलेखच्या 1967च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करण्यात आल्या
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवर सरकारी नोंदी बदलण्यात आल्या
सीआरझेड आणि एनडीझेड क्षेत्रांना डेव्हलपमेंट झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आलं
मढ आयलंड इथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनए नियमांचं उल्लंघन करुन नवीन बांधकामे करण्यात आली
दलाल, सरकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांचा या सगळ्यात हात होता
२०२१ मध्ये विधान परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी
या प्रकरणावर तत्कालिन सरकारचं लक्ष वेधलं होतं.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि संबंधितांवर
एफआयआर दाखल करण्याची मागणीही दरेकरांनी केली होती.