एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला, ना मी राजीनामा दिला. माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत, असे धनंजय मुंडेंनी म्हटले

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आज गाठीभेटींचा धडाका पाहायला मिळाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी राज्यपाल महोदयांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनजंय मुंडेंनी (Dhananjay munde) आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला असून अजित पवारांनी निर्णय राखून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, अजित पवारांनी (Ajit pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तातडीने भेट घेतल्याने या चर्चा जोर धरु लागल्या. दरम्यान, धनंजय मुंडेंनी एबीपी माझीशी बोलताना राजीनाम्याबाबत माहिती दिली. मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला ना मी राजीनामा दिला, अशा शब्दात राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलं आहे.   

मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला, ना मी राजीनामा दिला. माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, आज आमची विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नसल्याचेही मुंडेंनी म्हटले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या भेटीनंतरही धनंजय मुंडेंनी केवळ अन्न व नागरी खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचे वृत्त काही माध्यमांत झळकल्यानंतर मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.  

दरम्यान, जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचे समजते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे. 

अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्‍यांची भेट

दरम्यान, धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी देखील लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तत्पूर्वीच अंजली दमानिया यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही वेळातच अजित पवार सागर बंगल्यावर पोहोचले. अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली का, यासंदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, या तातडीच्या गाठीभेटीच्या अनुषंगाने राजीनाम्यावर सरकारकडून विचार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

हेही वाचा

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Embed widget