एक्स्प्लोर

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

पुण्याहुन हैद्राबादला निघालेल्या दिपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तुल आणि 28 जीवंत काडतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दिपक काटेला अटक करण्यात आली आहे.

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं असून पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्धही कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झालेल्या बीडमधील कैलास फड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आता त्यांचा शस्त्रपरवाना रद्द केलाआहे. एकीकडे बीडमध्ये (Beed) ही मोहीम जोरदारपणे चालवली जात असताना, दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तुलसह 28 काडतुसे आढळून आली आहेत. पुण्याहून (Pune) हैदराबादला जात असतानाच्या प्रवासात हे शस्त्र आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केलं आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे.  विशेष म्हणजे या व्यक्तीचे भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांसोबत फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.  

पुण्याहुन हैद्राबादला निघालेल्या दिपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तुल आणि 28 जीवंत काडतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दिपक काटेला अटक करण्यात आली आहे. दिपक काटेला पुणे विमानतळ पोलीस स्टेशनमधील पोलीसांच्या हवाली करण्यात आलंय. दिपक काटे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही आहे. सोशल मिडीयावर त्यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत असल्याने त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. एअर पोर्टच्या आतमध्ये प्रवेश करताना मेटल डीटेक्टरच्या सहाय्याने त्याच्याकडील बॅगचे चेकींग झाले, असता त्यामधे पीस्तुल आणि काडतुसे असल्याचे सुरक्षा रक्षकांना लक्षात आले. त्यानंतर त्याच्याकडील काटेरी बॅग उघडून पाहिली असता आतमध्ये 7.65 कॅलीबरचे पिस्तुल, दोन मॅगझीन आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी तात्काळ त्याच्याकडील पिस्तुल व त्यालाही ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

हेही वाचा 

Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुदडे पडू द्याचचे का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

RSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special DiscussionNagpur Aurangzeb Solgan Video : हिंसेपूर्वी जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजीही झाल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सNagpur Violance FIR | नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती, सूत्रधाराचे नाव समोर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
Embed widget