संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
हे बोलणं महाराष्ट्र मधील संवेदनशीलता संपली आहे, खून पडो, राजकीय नेत्यांना संबंध नाही. इतकं मोठं प्रकरण सुरू आहे, आरोप होत आहेत.
ठाणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधक व बीडमधील लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागितला जात आहे. मात्र, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ असे म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सूचवलं आहे. त्यातच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी आज राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, आजच मंत्री धनंजय मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतल्याने भेटीतं नेमकं काय चर्चा झाली यावरुन राजकीय खलबतं सुरू आहेत. आता, या भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी बीड प्रकरणावर बोलणे टाळले. तसेच, अजित पवारांची भेट ही केवळ खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे, व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असेही ते म्हणाले. त्यामुळे, या भेटीवर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. हे बोलणं महाराष्ट्रामधील संवेदनशीलता संपली आहे, खून पडो, राजकीय नेत्यांना संबंध नाही. इतकं मोठं प्रकरण सुरू आहे, आरोप होत आहेत. संशयची सुई धनंजय मुंडेंकडे आहे, खून मुंडेंनी केला असं मी म्हणत नाही. पण ज्यांनी केला त्यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे आहेत, असे म्हणत अजित पवारांसोबतच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अजित दादांसोबतच्या भेटीत मग नक्की काय बोललात. पदभार तर दोन दिवस आधी घेतलात तुम्ही, असं काय महत्वाचं सांगायला गेले होते खात्याबदल? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच, मतं दिली म्हणजे तुम्ही काय आमचे मालक झाले नाहीत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावरूनही आव्हाड यांनी टोला लगावला. माणुसकीच नाही, असं असतं तर अजित पवार काल तसं बोलले नसते, असे आव्हाड यांनी म्हटलं.
मोराळेच्या गाडीचा नारळ तुम्ही फोडला नाही का?
मुंडे आत काय बोलले हे माहित नाही, पण सविस्तर चर्चा झाली हे तरी सांगायचं पण चर्चाच झाली नाही आणि हा विषय तुच्छ आहे हे दाखवणं योग्य नाही. अजित दादा परिपक्व आहेत, ते काय बोले नसतील का. शिवलिंग मोराळेच्या गाडीचा नारळ तुम्ही फोडला नाहीत का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!