Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special Report
Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special Report
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. पण नुकतंच एका पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा दिसलं. भुजबळ खळखळून हसले. या हसण्याचं कारण होतं काही दिवसांपूर्वीची एक घटना...सेंबर महिन्यात चेहऱ्यावर नाराजीचा महापूर असणारे छगन भुजबळ आज मात्र असे मनापासून खदखदून हसताना दिसले.त्यांचं हसणं इतकं मनमुराद होतं की ते पाहून पत्रकारही आपलं हसू आवरू शकले नाहीत. या हसण्याचं 'निमित्त' पत्रकारांच्या आजच्या प्रश्नात असलं तरी त्याचा 'संदर्भ' होता गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारचा. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते.त्यावेळी पवारांनी एका कागदावर काही लिहून ती चिठ्ठी भुजबळांना दिली आणि भुजबळांनी डोळ्यात जीव आणून ती वाचली. त्यानंतर आज माध्यमांसमोर आलेल्या भुजबळांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा भुजबळांनी 'ओरिजिनल भुजबळ स्टाईल'नं अशी प्रतिक्रिया दिली.ज्या दिवशी शरद पवारांनी भुजबळांना चिठ्ठी दिली होती, त्याच दिवशी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास केला होता.यावेळीही भुजबळांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. त्या भेटीत भुजबळांनी नाराजीला जवळपासही फिरकू दिलं नव्हतं. तर फडणवीस आणि पवारांसोबतच्या भेटीत भुजबळांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद एका प्रश्नानं मात्र उडून गेला. एवढंच नाही, तर त्यांच्या भावनाही मेल्या.