Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?
Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधक व बीडमधील लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागितला जात आहे. मात्र, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ असे म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सूचवलं आहे. त्यातच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी आज राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, आजच मंत्री धनंजय मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतल्याने भेटीतं नेमकं काय चर्चा झाली यावरुन राजकीय खलबतं सुरू आहेत. आता, या भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.