सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025 06AM Superfast
सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025 06AM Superfast
HMPV व्हायरसचे भारतात एकूण सहा रुग्ण,बंगळुरूमध्ये ३ आणि ८ महिन्यांच्या दोन बाळांना, गुजरातमध्ये २ महिन्यांचा बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागण.
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना HMPV चा सर्वाधिक धोका, प्रतिकारक्षमता कमी असलेले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही व्हायरचा धोका, काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन.
HMVP व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून मुंबईत आढावा बैठक, विषाणूच्या संदर्भात उपाययोजन आणि खबरदारीवर चर्चा होणार,
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रूग्ण नाही, नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन.
HMPV विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी, न्यायालयाने हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे, असा नागपूर खंडपीठात अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सकाळी ११ वाजता मंत्रालयात बैठक होणार, कोणते महत्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष.