(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दिलासा नाही, याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टानं (Bombay High Court)त्यांची याचिका सुनावणीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती. आज देखील ही सुनावणी पुन्हा तहकूब केली असून आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी एकलपीठानं ही याचिका ऐकण्यास नकार दिल्यानंतर गुरूवारी यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे ईडीची बाजू मांडणार असल्यानं ही सुनावणी ऑनलाईन घेण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. याला विरोध करत अनिल देशमुखांनी ताताडीच्या दिलाश्याची मागणी कोर्टाकडे केली. मात्र याचिका ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं सुनावणी 29 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सुनावणीसाठी तहकूब केली होती