Auto Rickshaw Driver : दुप्पट पैसे देण्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाचा संताप,4 दिवसांनी गुन्हा दाखल
Auto Rickshaw Driver : दुप्पट पैसे देण्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाचा संताप,4 दिवसांनी गुन्हा दाखल
मीरा रोडच्या रामदेव पार्कमध्ये १८ फेब्रुवारी रोजी नशेत असलेल्या ऑटो चालकाने प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करत असलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीला रिक्षा चालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा सामना करावा लागला. भाड्याच्या वादातून रिक्षा चालकाने दुप्पट पैसे मागितले आणि नकार दिल्यावर शिवीगाळ करत रिक्षा चालवून चिरडण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळूनही, चार दिवसांनंतर मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.























