(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 5 PM : 22 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
१० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं उपोषण स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार
छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती
सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही...मागण्यांसदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक...सरकारचं हाके आणि वाघमारेंना आश्वासन..
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य, महायुतीत अजितदादांचं मानसिक खच्चीकरण सुरु असल्याचाही आरोप
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, दुष्काळापाठोपाठ शेतकऱ्यांवर पाणीपट्टीवाढीचं संकट, ऊस, केळीसह बारमाही पिकांना फटका बसण्याची शक्यता तर विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोयता गँगचा हैदोस, वडगाव शेरीत पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० गाड्यांची तोडफोड, कोयता गँगचं पोलिसांसमोर आव्हान