Para Championships : जॉर्डन पॅरा चॅम्पियनशिप टेबल टेनिसमध्ये सांगलीच्या पृथ्वी बर्वेचं यश, पटकावलं सुवर्णपदक
जॉर्डन या ठिकाणी सुरू असलेल्या पॅरा चॅम्पियनशिप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताने एकूण 12 पदकं कमावली आहेत. त्यामध्ये चार सुवर्णपदकांचा समावेश आहे.

मुंबई: जॉर्डनमधील पॅरा चॅम्पियनशिप 2022 टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रातील पृथ्वी बर्वेनं सुवर्णयश मिळवलय. पृथ्वीने जर्मनीच्या ऑलिव्ह तिझियानाला सरळ गेम्समध्ये मात देत सुवर्ण पदकावर नाव कोरलंय. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेली पृथ्वी ही सर्वात कमी वयाची स्पर्धक होती. 19 मे ते 22 मे दरम्यान जॉर्डनची राजधानी अमान येथे पॅरा चॅम्पियनशीप टेबल टेनीस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने एकूण 12 सुवर्ण पदकं पटकवली आहेत.
पृथ्वी बर्वे ही सांगलीतील विटा तालुक्यातील आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पृथ्वीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणातच पदक मिळवण्याची किमया केली आहे. जर्मनीच्या ऑलिव्ह तिझियाना ही गेल्या वेळची विजेती खेळाडू होती. तिच्यावर मात करत पृथ्वीने हे यश संपादन केलं आहे.
पृथ्वी पुण्याच्या शारदा सेंटर येथील प्रशिक्षक दीप्ती चाफेकर आणि सुरेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तसेच सातारा येथील ललित सातघरे यांचे तिला प्रशिक्षण लाभलं आहे.
भारताने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकूण 12 मेडल्स मिळवले आहेत. त्यामध्ये चार गोल्ड, चार सिल्व्हर आणि चार ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे.
भारताकडून गोल्ड मेडल विजेते
1. भाविना पटेल
2. सोनम पटेल
3. पृथ्वी बर्वे
डबल्समध्ये पदक विजेते
1. भाविना पटेल आणि सोनम पटेल
डबल्समध्ये सिल्व्हर मेडल विजेते
1. रमेश आणि जसवंत
2. भाविका आणि उम्रान
मिक्सड् डबल्स
1. सोनम पटेल आणि रमेश
2. भाविना आणि जसवंत
ब्रॉन्झ मेडल विजेते
1. नाजिम जावेद खान MS7
2. राज अरविंदन MS5
3. योगेश MS10
डबल्स
1. अन्शुल अगरवाल आणि योगेश
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
