(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubman Gill : शुभमन गिल भारताचा 'स्टार', रोहित-विराटने केले कौतुक
Shubman Gill, Virat Kohli, Rohit Sharma : भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिल याने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईविरोधात शतकी खेळी केली.
Shubman Gill, Virat Kohli, Rohit Sharma : भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिल याने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईविरोधात शतकी खेळी केली. शुभमन गिल याने आयपीएल करिअरमधील तिसरे शतक झळकावले. शुभमन गिल याच्या शतकाच्या बळावर गुजरातने 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याने शतक झळकावल्यानंतर सोशल मीडिया कौतुकचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटू गिलच्या शानदार खेळीचे कौतुक करत आहेत. शुभमन गिल याने कौतुक केल्यानंतर रोहित शर्माने तर मैदानावर पाट थोपाटली. गिल याच्या पाठीवर शबासकी देत रोहित शर्मा याने त्याचे कौतुक केले. तर इंग्लंडमध्ये असणाऱ्या विराट कोहलीने गिल याचे कौतुक केलेय. विराट कोहलीने शुभमन गिल याचा शतकी खेळीचा फोटो पोस्ट केला. त्यासोबत स्टार असा इमोजी पोस्ट करत कौतुकाचा वर्षाव केला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी याआधीही गिल याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. शुभमन गिल भारताच्या क्रिकेटचे भविष्य असल्याचे विराट कोहलीने म्हटले होते.
Rohit Sharma congratulated Shubman Gill for his incredible century. pic.twitter.com/WcEZ22h4vP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
Virat Kohli's Instagram story for the star - Shubman Gill. pic.twitter.com/7lDCF20dFe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
Spirit of Cricket 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
Rohit Sharma 🤝 Shubman Gill #TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI pic.twitter.com/x6pRcthNOb
Rohit Sharma appreciated Shubham Gill's Knock#IPL2023 #GTvMI pic.twitter.com/0xVqFkA7BO
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 26, 2023
माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यानेही ट्वीट करत गिलचे कौतुक केले. काय खेळाडू आहे.. चार सामन्यात तिसरे शतक झळकावले.. शॉट तर लाजबाव होते... धावांची भूक अशीच राहू दे... असे ट्वीट सेहवागने गेलेय.
What a player. 3rd hundred in 4 matches and some breathtaking shots. Amazing consistency and hunger, the kind of stuff big players do, cash in on the purple patch #ShubhmanGill pic.twitter.com/nUjXoLRKaA
— Virender Sehwag (@virendersehwag) May 26, 2023
शुभमन गिल याने 60 चेंडूत 129 धावांची फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. गिलच्या झंझावातापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. शुभमन गिल याने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढच्या 17 चेंडूत शतक झळकावले. शुभमन गिल याने 60 चेंडूत 10 षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. यंदाच्या हंगामातील गिलचे हे तिसरे शतक होय. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दमदार सुरुवात केली. साहा लवकर बाद झाला पण.. गिल याने दुसऱ्या बाजूला आपले काम चोख बजावले. गिल याने आजच्या सामन्यात नववी धाव घेताच मोठा विक्रम नावावर गेला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा कराणारा फलंदाज ठरलाय. गिल याने आरसीबीच्या फाफचा विक्रम मोडीत काढलाय. गिल याने 15 सामन्यात 722 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात गिल याने शतकी खेळी करत आठशे धावांचा पल्ला पार केला आहे.