
VIDEO : शिखर धवन, राहुल चहरने झाडाखालीच पत्त्याचा डाव मांडला, पोलीस आले आणि....
IPL 2023 : शिखर धवन सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये धवन पहिल्या क्रमांकावर आहे.

IPL 2023 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये धवन पहिल्या क्रमांकावर आहे. शिखर धवन मैदानावर जितका मस्ती करत असतो, तितकाच मैदानावरही मस्ती करताना पाहायला मिळतोय. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तो रील्सही करत असतो. असाच एक रिल पंजाबच्या संघाने शेअर केला आहे. यामध्ये शिखर धवन आणि राहुल चहर पत्ते खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडतोय.
पंजाबने ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत शिखर धवन याच्यासोबत राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार दिसत आहेत. यामध्ये एका झाडाखाली पत्ते खेळताना दिसत आहेत. त्याचवेळी पोलीस सायरन वाजतो... सायरनचा आवाज ऐकल्यानंतर राहुल चाहर आणि हरप्रीत धावत सुटले... त्यावेळी पोलीस तिथे आला... त्यावेळी शिखर म्हणतो.. अरे माघारी या हा तर आपला काका आहे. माघारी या.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Pols aa gayi pols! 😂🫢
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 11, 2023
📹: @SDhawan25#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #PunjabKings #TATAIPL pic.twitter.com/TCoPqI7QMu
सात सेकंदाच्या या व्हिडीओवर कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी शिखर धवनच्या अभिनयाचे कौतुक केलेय. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
View this post on Instagram
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शिखर धवनच्या नेतृत्वात पंजाब संघाने दमदार कामगिरी केली आहे. पंजाबने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. ते गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत. पंजाबचा कर्णधार शिखर धवन सध्या तुफान फॉर्मात दिसतोय. सध्या सर्वाधिक धावांच्या यादीत धवन पहिल्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन अर्धशतकासह 225 धावा करत धवनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. धवन याने नाबाद 99 धावांची खेळी केली आहे.
शिखर धवन याने अनेक रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याच्या रिल्सला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक चाहते त्याचे रिल्स अन् व्हिडीओ एन्जॉय करत असतात..
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
