पाठीवर शाबासकीची थाप, किंग विराटकडून प्रिन्स शुभमन गिलचं खुल्या दिलाने कौतुक
Shubman Gill : विराट कोहलीच्या शतकावर शुभमन गिल याचे शतक वरचढ ठरले. शुभमन गिल याच्या शतकाच्या बळावर गुजरातने सहज विजय मिळवला.
Virat Kohli hugged and congratulated Shubman Gill : अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी आपापल्या संघासाठी शतक झळकावले. विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करताना शतकाला गवसणी घातली. तर शुभमन गिल याने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले. गिल याने शतक ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. सामन्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिल याचे कौतुक केले.
विराट कोहलीच्या शतकावर शुभमन गिल याचे शतक वरचढ ठरले. शुभमन गिल याच्या शतकाच्या बळावर गुजरातने सहज विजय मिळवला. आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज नाराज असल्याचे दिसले.. गुजरातच्या विजानंतर विराट कोहलीला राग अनावर आला होता.. हातातली पाण्याची बाटली फेकून दिली होती. आपले दुख लपवण्यासाठी विराट कोहलीने टोपीची मदत घेतली होती. पण सामन्यानंतर विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत शुभमन गिल याचे कौतुक केले.
Obviously as a sportsman Kohli sees the positive side of it and the scum that claim to be fans are abusing pic.twitter.com/DcJUMCud4R
— Gajala - CEO, Sonic Solutions (@Hramblings) May 21, 2023
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिल याची गळाभेट करत कौतुक केले. गिल याचे अभिनंदन केले.. विराट आणि गिल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विराट कोहलीने गिल याचे कौतुक करायची ही पहिलीच वेळ नाही. गिल याने याआधी शतकी खेळी केली.. तेव्हा विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत गिलचे खास कौतुक केले होते.
विराट कोहलीने गिलची गळाभेट घेत केलेले कौतुक सोशल मीडियावर चर्चाचा विषय आहे. नेटकरी विराटच्या कृत्याचे कौतुक करत आहेत. आरसीबीच्या काही चाहत्यांनी गिल याला शतकानंतर सोशल मीडियावर ट्रोल केले होते. त्यातच विराट कोहलीने खिलाडीवृत्ती दाखवत गिलचे कौतुक केले. विराट कोहली आणि गिल दोघेही खूश दिसत होते. पराभव विसरुन विराट कोहलीने गिलचे कौतुक केले..
Virat Kohli hugged and congratulated Shubman Gill.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
The two centurions of the night - The King and the Prince! pic.twitter.com/acARvCvSe5
Virat Kohli gifted Rashid Khan a signed jersey and hugged him.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2023
A beautiful moment between two of the greats of cricket! pic.twitter.com/degN0bjie3