GT vs SRH Score Live IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सचा 7 विकेट्सने विजय
GT vs SRH IPL 2024: हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला.
LIVE

Background
गुजरातचा 7 विकेट्सने विजय
हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला.
Match 12. Gujarat Titans Won by 7 Wicket(s) https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
साई सुदर्शन बाद
साई सुदर्शनला पॅट कमिन्सने झेलबाद केले. साई सुदर्शन 36 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. आता गुजरातला जिंकण्यासाठी फक्त 25 धावांची आवश्यकता आहे.
गुजरातला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 49 धावांची गरज
गुजरातला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 49 धावांची गरज आहे.
गुजरातने 13 षटकांत 2 विकेट्स गमावत केल्या 98 धावा
गुजरातने 13 षटकांत 2 विकेट्स गमावत 98 धावा केल्या आहेत. साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर सध्या फलंदाजी करत आहे.
गुजरातला दुसरा धक्का, शुभमन गिल बाद
गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. शुभमन गिल ३६ धावा करून बाद झाला. त्याने 28 चेंडूंचा सामना करत 36 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. गिलला मार्कंडेयने बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
