
World Cup 2023 : लढावय्या स्मिथ... फिल्डिंग करताना दुखापत, रक्त येत असतानाही मैदान सोडले नाही
World Cup 2023 : एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूंनी झेल सोडले असताना स्मिथ याने दुखापतीनंतरही प्रभावी फिल्डिंग केली. दुखापत झाल्यानंतर रक्त येत असतानाही मैदान सोडले नाही.

AUS vs PAK, World Cup 2023 : हायस्कोरिंग सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 305 धावांपर्यंत मजल मारु शकला. अॅडम झम्पा, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी खेळी केली. तर अॅडम झम्पा याने चार विकेट घेतल्या. 163 धावांची विस्फोटक खेळी करणाऱ्या डेविड वॉर्नर याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात स्टिव्ह स्मिथच्या फिल्डिंगचे कौतुक होत आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूंनी झेल सोडले असताना स्मिथ याने दुखापतीनंतरही प्रभावी फिल्डिंग केली. दुखापत झाल्यानंतर रक्त येत असतानाही मैदान सोडले नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत दहा पेक्षा जास्त झेल सोडले, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. अशा स्थितीत स्मिथने शानदार फिल्डिंग करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्मिथच्या फिल्डिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सामना जिंकण्यासाठी फिल्डिंग महत्वाची असते. गोलंदाजी आणि फलंदाजी इतकेच फिल्डिंगचेही महत्वं असते. याचे उदाहरण स्टीव्ह स्मिथने बेंगळुरुच्या मैदानावर दिले. पॉइंटवर फिल्डिंग करत असताना स्टीव्ह स्मिथने एक चेंडू अडवला, तो थांबवण्याचा प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला खरचटले. त्यानंतर रक्तही वाहू लागले. जे स्पष्ट दिसत होते, पण तरीही स्टीव्ह स्मिथने धाव जाऊ दिली नाही. इतकेच नाही तर मैदानही सोडले नाही. पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना स्मिथने अप्रतिम फिल्डिंग करत आपले अमुलाग्र योगदान दिले.
पाकिस्तानच्या फलंदाजी सुरु असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स 14 वे षटक टाकत होता. त्या षटकातील एक चेंडू पॉइंट एरियामध्ये गेला, जो थांबवण्यासाठी स्टीव्ह स्मिथने डायव्ह केला. डायव्हिंग करताना स्मिथच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यातून रक्तही वाहू लागले. कॅमेऱ्यात टिपलेल्या छायाचित्रात स्टीव्ह स्मिथची दुखापत स्पष्टपणे दिसत होती. या क्षेत्ररक्षणादरम्यान स्टीव्ह स्मिथ दुखात होता, पण तरीही तो मैदानाबाहेर गेला नाही आणि सामन्यात क्षेत्ररक्षण सुरूच ठेवले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव करून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची शतकं, तसंच त्यांनी 259 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा विजय, तर पाकिस्तानचा दुसरा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पाकिस्ताननं त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा डाव 305 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पानं चार, तर पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नरनं 163 आणि मिचेल मार्शनं 121 धावांची खेळी उभारली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
