एक्स्प्लोर

वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल

वाल्मिक कराड यांच्यावर एकही गुन्हा नाही, आम्हाला पुरावा दाखवा. आम्हाला कुठून ना कुठून तरी कळणार ना, त्यानुसार अण्णा पुण्याला येत असल्याचे कळताच आम्ही इकडे आलं.

पुणे : बीड जिल्ह्यातील सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. केज तालुक्यातील एका खंडणीप्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल असून राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर वाल्मिक कराडने आज पुण्यातील (Pune) सीआयडी कार्यालयात समर्पण केले. त्यानंतर, सीआयडी पोलिसांनी (Police) प्राथमिक चौकशी करुन आरोपीला बीडच्या सीआयडींच्या ताब्यात दिले आहे. मात्र, वाल्मिक कराड पुण्यात आल्याची माहिती मिळताच त्याच्या समर्थकांनीही पुणे गाठलं होतं. यावेळी, काही पुण्यातील, अहमदनगरमधील व काही परळीतील त्याच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे हजेरी लावली. यावेळी,माध्यमांशी संवाद साधताना वाल्मिक अण्णाला राजकीय हेतुने या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचं त्याच्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.  

वाल्मिक कराड यांच्यावर एकही गुन्हा नाही, आम्हाला पुरावा दाखवा. आम्हाला कुठून ना कुठून तरी कळणार ना, त्यानुसार अण्णा पुण्याला येत असल्याचे कळताच आम्ही इकडे आलं. अण्णा आरोपी नाहीत, राजकीय हेतूने हे होत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे हे सगळं होतंय. बीड जिल्ह्यातले आमदार आहेत, जे ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे राजकारण करत आहेत. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी वाल्मिक अण्णा उज्जैनला होते. मग, 302 मध्ये काय उज्जैनहून चाकू मारला काय, असा सवाल कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. 

ज्या दिवशी गुन्हा घडला, त्यादिवशी वाल्मिक अण्णा उज्जैनला होते. मग, आता उज्जैनहून चाकू फेकून मारला का, असा संतप्त सवाल माध्यमांशी प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. तसेच, वाल्मिक कराड यांना गोवण्यात येत असून या गुन्ह्यात त्यांचा कसलाही संबंध नसल्याचेही पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे. 302 करा, फाशीच द्या असे कुणीही आरोप केल्यावर माणूस भिणारचं ना, म्हणून ते इतके दिवस बाहेर होते. ज्या किशोर फडचा खून झाला, त्या किशोरचा मी भाऊ आहे, त्यामध्ये बबन गितेचं नाव होतं. बबन गिते खरा संघटीत गुन्हेगारीचा बादशहा आहे, असेही पुण्यात आलेल्या एका कार्यकर्त्याने म्हटलं. 

केजमधील न्यायायातही कार्यकर्त्यांची गर्दी

वाल्मिक कराडला आज केजमधील न्यायालयात हजर करण्यात येत असून केजमधील न्यायालयाबाहेरदेखील त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली होती. आरोपीच्या समर्थनार्थ आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हाकलून लावले आहे. मात्र, काही काळ न्यायालय परिसरातही गाड्या घेऊन कार्यकर्ते जमल्याचं दिसून आलं. दरम्यान, वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केल्यांवर न्यायाधीशांकडून काय आदेश देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Embed widget