एक्स्प्लोर

RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर

Bank Account Closed : नववर्षात तीन प्रकारची बँक खाती बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. सुरक्षेच्या कारणावरुन तीन प्रकारची खाती बंद केली जाणार आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. कोणत्या प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

आरबीआयनं फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी, बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी  हा निर्णय घेतला आहे. गेल्या 12 महिन्यांपासून ज्या बँक खात्यांमध्ये कसलाच व्यवहार झालेला नाही, ती खाती बंद करण्याचा आरबीआयनं निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळं जी खाती 12 महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असतील ती बंद होतील. 

इनअ‍ॅक्टिव्ह खाती

ज्या बँक खात्यांमध्ये गेल्या 12 महिन्यांपासून किंवा अधिक काळापासून कोणताही व्यवहार झालेला नाही त्यांना इनअ‍ॅक्टिव्ह कॅटेगरीत टाकलं जाईल. एखाद्या खातेधारकानं एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खातं इनअ‍ॅक्टिव्ह कॅटेगरीत टाकलं जाईल. तुम्ही आवश्यकता असल्यास बँकेशी संपर्क करु अ‍ॅक्टिव्ह करु शकता. फसवणकीच्या प्रकरणांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

झिरो बँलन्स खाती

ज्या  खात्यांमध्ये दीर्घ काळापासून शिल्लक रक्कम शून्य असेल अशी खाती देखील बंद केली जाणार आहेत. खात्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. ग्राहकांना त्यांच्या खात्याचा वारंवार उपयोग करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आलं आहे. तुमच्या खात्यात दीर्घ काळापासून व्यवहार झाला नसल्यास बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन केवायसी करुन घेणं आवश्यक आहे. 

डॉरमॅट अकाऊंट 

ज्या खात्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी कोणताही व्यवहार झाला नसेल तर ती खाती डॉरमॅट खाती म्हणून ओळखली जातात. ही खाती सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. त्यांच्याकडून ही खाती हॅक होतात आणि त्याचा वापर लोकांच्या फसवणुकीसाठी केला जातो.

दरम्यान, सामान्य नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरुन फोन आल्यास पासवर्ड, पिन अथवा ओटीपी शेअर करु नये. अनोळखी व्यक्ती सोबत तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील शेअर केल्यास नुकसानीचा सामना कराव लागू शकतो. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget