एक्स्प्लोर
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo's
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: सध्या भारताची धावसंख्या 358/9 अशी आहे. भारत अजूनही 116 धावांची पिछाडीवर आहे.

IND VS AUS
1/8

नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
2/8

नितीश कुमार रेड्डीने 172 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 10 चौकार आणि एक खणखणीत षटकार लगावला.
3/8

नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात ही कामगिरी केली आहे.
4/8

नितीश रेड्डीने शतक झळकावल्यानंतर मैदानात उपस्थित असणाऱ्यांसोबतच सर्व भारतीय भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
5/8

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा कसोटी सामना पाहण्यासाठी नितीश रेड्डीचे कुटुंबीय देखील आले होते. यावेळी नितीश कुमारचे वडीलांना मुलाचं शतक बघून आनंदाने रडू कोसळले.
6/8

सध्या खराब हवामानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थोडावेळ थांबवण्यात आला आहे.
7/8

सध्या भारताची धावसंख्या 358/9 अशी आहे. भारत अजूनही 116 धावांची पिछाडीवर आहे. नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराज सध्या मैदानात आहेत.
8/8

ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकावणारे एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत. सचिनने 18 वर्षे 253 दिवस वयाच्या जानेवारी 1992 मध्ये सिडनी येथे खेळताना ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक झळकावले होते. त्यानंतर केवळ 30 दिवसांनी पर्थमध्ये खेळताना सचिनने आणखी एक शतक झळकावले. तर ऋषभ पंतने 2019 मध्ये सिडनी येथे वयाच्या 21 वर्षे 92 दिवसांत शतक झळकावले होते. त्यांच्यानंतर आता नितीश रेड्डी यांचे नाव या यादीत गणले जाणार आहे.
Published at : 28 Dec 2024 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
