ICC Test Rankings : विराट विजयासह भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल
ICC Test Rankings : मुंबई कसोटी भारतीय संघानं न्यूझीलंडचा 372 धावांनी विराट पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
ICC Test Rankings : मायदेशात न्यूझीलंडविरोधातील मालिका भारतीय संघानं 1-0 च्या फरकाने जिंकली. जयपूरमध्ये झालेल्या पहिला कसोटी सामना अनिर्णित झाला होता. मुंबई कसोटीत मात्र भारतीय संघानं वर्चस्व राखलं. मुंबई कसोटी भारतीय संघानं न्यूझीलंडचा 372 धावांनी विराट पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पण या पराभवाचा न्यूझीलंडच्या संघाला फटका बसलाय. न्यूझीलंडच्या संघाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
सोमवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली. यामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघ 124 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकवर असणाऱ्या न्यूझीलंड संघाचे 121 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 10/8 गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या नावावर 107 तर पाकिस्तानचे 92 गुण आहेत.
पाहा गुणतालिका -
🔝
— ICC (@ICC) December 6, 2021
India are back to the No.1 spot in the @MRFWorldwide ICC Men’s Test Team Rankings.#INDvNZ pic.twitter.com/TjI5W7eWmq
भारतीय संघ कोसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असला तरी 'वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप' (WTC) च्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. WTC च्या गुणतालिकेत श्रीलंका संघ पहिल्या तर पाकिस्तान संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
The ICC World Test Championship standings after India’s win in the Mumbai Test 👇#WTC23 | #INDvNZ pic.twitter.com/YNrMyEvohr
— ICC (@ICC) December 6, 2021
कसोटीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद -
IND vs NZ 2nd Test: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं न्यूझीलंडला (IND Vs NZ) तब्बल 372 धावांनी पराभूत केलंय. न्यूझीलंडला 372 धावांनी पराभूत करून भारतानं सर्वात मोठ्या विजयाची नोंद केलीय. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध 337 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना दिल्लीत खेळण्यात आला होता.
भारताचा सर्वात मोठा विजय -
भारतीय क्रिकेट संघानं 2008 साली मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 320 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2016 साली न्यूझीलंडविरुद्ध इंदौर येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारतानं 321 धावांनी विजय मिळवला होता.